WTC Final Day 5  : न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला, शमीचे चार बळी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा आज पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा विशेषतः मोहम्मद शमी आणि इशांत शर्माचे वर्चस्व पाहायला मिळाले.

ind vs nz icc world test championship final live score day 5
WTC Final Day 5  : न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला, शमीचे चार बळी 

थोडं पण कामाचं

  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा आज पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा विशेषतः मोहम्मद शमी आणि इशांत शर्माचे वर्चस्व पाहायला मिळाले.
  • उपाहारानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव ९९.२ षटकात २४९ धावांवर संपुष्टात आला.
  • मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज एकानंतर एक बाद झाले.

साउथहॅम्पटन :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा आज पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा विशेषतः मोहम्मद शमी आणि इशांत शर्माचे वर्चस्व पाहायला मिळाले. उपाहारानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव ९९.२ षटकात २४९ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज एकानंतर एक बाद झाले.  त्याने ४ बळी घेतले, तर दीडशेपेक्षा जास्त चेंडू खेळणाऱ्या केन विल्यमसनने ४९ धावा करत संघाला आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडकडे आता ३२ धावांची आघाडी आहे. भाताकडून इशांत शर्माने तीन विकेट घेतल्या. 

न्यूझीलंडचा पहिला डाव

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला आणि पहिल्या डावाला सुरुवात केली. ईशांत शर्माने भारताकडून पहिले षटक टाकले. चहापानानंतर लॅथम-कॉन्वे यांनी २७व्या षटकात न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर लावले. खेळपट्टीवर स्थिरावलेला न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.  लॅथमने ३० धावा केल्या. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. चांगली खेळी करणारा डेव्हॉन कॉन्वेने आपले ४४व्या षटकात आपले  अर्धशतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कॉन्वेला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने कॉन्वेचा अप्रतिम झेल टिपला. कॉन्वेने १५३ चेंडूचा सामना करत ६ चौकरांसह ५४ धावांची खेळी केली. 

त्याच्यानंतर कर्णधार केन विल्यमसनची साथ देण्यासाठी रॉस टेलर मैदानात आला. पाचव्या दिवशी मोहम्मद शमीने भारताला लवकर यश मिळवून दिले. टेलर वैयक्तिक ११ धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिलने टेलरचा  चित्तथरारक झेल घेतला. त्यानंतर इशांत शर्माने हेन्री निकोलसला स्लीपमध्ये बाद केले.  रोहित शर्मा शानदार झेल घेत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. निकोलसने ७ धावा केल्या. कारकिर्दीची शेवटची कसोटी खेळणाऱ्या बीजे वॉटलिंगही पहिल्या डावात काही खास करू शकला नाही. मोहम्मद शमीने एका अप्रतिम चेंडूवर त्याचा एका धावेवर त्रिफळा उडवला.

भारताने ८०व्या षटकानंतर नवा चेंडू घेतला. उपाहारानंतर मोहम्मद शमीने न्यूझीलंडला अजून एक हादरा दिला. शमीने त्याने कॉलिन डी ग्रँडहोमेला पायचित करत माघारी धाडले. त्यानंतर मैदानात आलेल्या काईल जेमीसनने झटपट २१ धावा काढल्या. मात्र तोही शमीचा बळी ठरला. ८९व्या षटकात न्यूझीलंडने आपले द्विशतक पूर्ण केले. कर्णधार केन विल्यमसनने न्यूझीलंडची एक बाजू लावून धरली. तब्बल १७७ चेंडूंचा सामना करत खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेल्या विल्यमसनला ईशांत शर्माने बाद केले. विल्यमसनने ६ चौकारांसह ४९ धावांची खेळी केली. टिम साऊदीने ३० धावांची खेळीत करत संघसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३० धावांची खेळी केलेल्या टिम साऊदीचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ७६ धावात ४ बळी घेतले. तर इशांत शर्माने ३, जडेजाने २ आणि अश्विनने १ बळी घेतला. या डावात सर्वाधिक षटक टाकणाऱ्या जसप्रित बुमराला एकही विकेट मिळाली नाही. 

भारताचा पहिला डाव

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला १९ जूनपासून सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी भारताने १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारत पहिल्या डावात ९२.१ षटकात २१७ धावा करू शकला. विराटने ४४ तर अजिंक्यने ४९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने ३१ धावांत ५ बळी घेत भारताच्या डावाला सुरूंग लावला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी