IND vs NZ: टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली मॅच पावसामुळे ड्रॉ करण्यात आली. त्यानंतर आता दोन्ही टीम्समध्ये दुसरी मॅच सुरू आहे. दुसऱ्या टी-20 मॅचपूर्वी न्यूझीलंडचा धडाकेबाज बॅट्समन ग्लेन फिलिप्स याने टीम इंडियाचा बॅट्समन सूर्यकुमार यादव याच्यासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. (IND vs NZ serial updates new Zealand batsman Glenn Phillips gives big statement about team india suryakumar yadav read in marathi)
न्यूझीलंडचा बॅट्समन ग्लेन फिलिप्स याने सूर्यकुमार यादवचं कौतुक करताना म्हटलं, तो स्वप्नातही टीम इंडियाच्या दिग्गजप्रमाणे शानदार शॉट्स खेळू शकत नाही. सूर्यकुमार यादव टी-20 रॅकिंगमध्ये जगातील अव्वल बॅट्समन आहे. टीम इंडिया जेव्हा न्यूझीलंड विरुद्ध मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्यासमोर ग्लेन फिलिप्स याला रोखण्याचं आव्हान असणार आहे. ग्लेन फिलिप्सने 'बे ओव्हल' मैदानात 46 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावली आहे. त्याची ओळख एक आक्रमक आणि धडाकेबाज बॅट्समन अशी आहे.
हे पण वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात
ग्लेन फिलिप्सने स्टफ डॉट को डॉट एनझेड सोबत बोलताना म्हटलं, सूर्यकुमार यादव खूपच अविश्वसनीय आहे. तो जे काही करतो तशा प्रकारे खेळण्याचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. मला प्रयत्न करायला आवडेल पण माझा खेळ त्याच्यापेक्षा खूपच वेगळा आहे. मनगटाच्या ताकदीने सिक्सर मारायची क्षमता त्याला खास बनवते. त्याच्यासारखी प्रतिभा खूपच कमी जणांमध्ये दिसून येते. मी आणि सूर्यकुमार यादव ज्याप्रकारे खेळतो त्यामुळे प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलर्सला विकेट घेण्याची संधी मिळते.
हे पण वाचा : हिवाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी? या आहेत टिप्स
ग्लेन फिलिप्सने पुढे म्हटलं की, माझ्याकडे ताकद आहे आणि त्याच्याकडे त्याची ताकद आहे. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपलं काम करतो. ज्या पद्धतीने आम्ही दोघे खेळतो त्याामुळे प्रतिस्पर्धी टीमला आम्हाला आऊट करण्याची संधी मिळते. टी-20 सीरिज ही जोखीम आणि अवॉर्ड याचा एक भाग आहे.
सूर्यकुमार यादवने या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 43 च्या सरासरीने 186 च्या स्ट्राईक रेटसह टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 1040 रन्स बनवले आहेत. त्याने यावर्षी टी-20 फॉरमॅटमध्ये जगातील सर्वाधिक रन्स करणाऱ्या प्लेअर्सच्या यादीत अव्वल ठरला आहे. या यादीत फिलिप्स आठव्या क्रमांकावर आहे. त्याने 158 हून अधिकच्या स्ट्राईक रेटसह 650 रन्स बनवले आहेत. सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाकडून टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये यावर्षी 1000 रन्स बनवणारा पहिला बॅट्समन बनला आहे.