IND vs NZ Series Schedule 2021: न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात होणार तीन टी-२० आणि दोन कसोटी, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs NZ Series Schedule 2021: आयसीसी टी-20 विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक होती. मात्र आता भारतीय क्रिकेट संघ त्याला मागे टाकून नवी सुरुवात करणार आहे. विश्वचषकच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक कसे आहे आणि सामने कुठे खेळले जातील याचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत.

ind vs nz series full fixtures venu timings in all you need to know about new zealand tour of india 2021 schedule
न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक 
थोडं पण कामाचं
  • आयसीसी टी-20 विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक होती.
  • विश्वचषकच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.
  • . या दौऱ्याचे वेळापत्रक कसे आहे आणि सामने कुठे खेळले जातील याचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत.

IND vs NZ Series Schedule 2021: आयसीसी टी-20 विश्वचषक 2021ची कालच सांगता झाली.  ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदा T20 विश्वविजेता झाला आहे. या विश्वचषकात भारताची  (India) कामगिरी निराशाजनक होती. विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाला सुपर 12  पुढेही जाता आले नाही. मात्र आता भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) त्याला मागे टाकून नवी सुरुवात करणार आहे. संघाला टी-20 मध्ये नवा कर्णधार आणि प्रशिक्षक मिळाला आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नवा कर्णधार तर राहुल द्रविड संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनला आहे.

हे दोघेही न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध टी-20 मालिकेतून संघाची जबाबदारी सांभाळतील आणि संघाला एका नव्या आयामावर घेऊन जाण्यास प्रयत्नशील असतील. विश्वचषकच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर (NZ Tour of IND) येणार आहे.

T20 विश्वचषक 2021 च्या अंतिम फेरीत पोहोचलेला न्यूझीलंड पहिला संघ आहे. केन विल्यमसनच्या किवी संघासाठीही भारत दौरा जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेव्यतिरिक्त दोन सामन्यांची कसोटी मालिकेत आमनेसामने भिडतील. पहिला टी-20 सामना जयपूरमध्ये होणार असून त्यासाठी भारतीय संघ तिथे पोहोचला आहे. तसेच मालिकेतील दोन टी-20 सामन्यांसाठी प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक कसे आहे आणि सामने कुठे खेळले जातील याचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत.

तीन सामन्यांची टी-20 मालिका

  1. पहिला सामना - बुधवार, 17 नोव्हेंबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर, वेळ - संध्याकाळी 7 वाजता
  2. दुसरा सामना - शुक्रवार, 19 नोव्हेंबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड, JSCA इंटरनॅशनल स्टेडियम रांची, वेळ - संध्याकाळी 7 वाजता
  3. तिसरा सामना- रविवार 21 नोव्हेंबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड, ईडन गार्डन स्टेडियम, कोलकाता, वेळ - संध्याकाळी 7 वाजता

दोन सामन्यांची कसोटी मालिका

  1. पहिला सामना, 25 ते 29 नोव्हेंबर, भारत आणि न्यूझीलंड, ग्रीन पार्क, कानपूर, सकाळी 9:30 वाजता
  2. दुसरा सामना, 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर भारत आणि न्यूझीलंड, वानखेडे स्टेडियम, मुंबई, सकाळी 9:30 वाजता

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी