IND vs NZ T20, Ruturaj Gaikwad RULED OUT of T20 series, reports to NCA with wrist injury : भारताने न्यूझीलंड विरुद्धची 3 मॅचची वन डे सीरिज 3-0 अशी जिंकली. याआधी भारताने श्रीलंकेविरुद्धची वन डे सीरिज 3-0 अशी तर टी 20 सीरिज 2-1 अशी जिंकली. लागोपाठ विजय मिळवूनही टीम इंडिया चिंतामुक्त झाल्याचे दिसत नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 मॅचची टी 20 सीरिज शुक्रवार 27 जानेवारी 2023 पासून सुरू होत आहे. ही सीरिज सुरू होण्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे.
भारताच्या टी 20 टीमचा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्या मनगटाला दुखापत झाली आहे. सध्या ऋतुराज गायकवाडवर बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy, M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) उपचार सुरू आहेत. तसेच भारताचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीवर उपचार करून घेण्यासाठी आधीपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. तो न्यूझीलंड विरुद्धच्या वन डे सीरिजमध्ये खेळू शकला नव्हता. आता ऋतुराज पण अनफिट दिसत आहे. यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीममध्ये पृथ्वी शॉ याचा समावेश होण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉ याआधी 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाकडून शेवटची मॅच खेळला आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी भारतीय संघ (Team India, Indian Team, Indian Squad) : हार्दिक पांड्या (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, जीतेश शर्मा (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, मुकेश कुमार, शिवम मावी, उमरान मलिक
भारताविरुद्धच्या विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी न्यूझीलंडची टीम (Team New Zealand, New Zealand Squad) : मिशेल सेंटनर (कॅप्टन), डेवोन कॉनवे (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, बेंजामिन लिस्टर, मार्क चॅपमॅन, डेरिल मिशेल, डेन क्लीवर (विकेटकीपर), फिन अॅलन, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), याकूब डफी, हेनरी शिपली, माइकल रिपन, लोकी फर्ग्यूसन, ईश सोढी, ब्लेयर टिकनर
Ganesh Jayanti 2023 Images in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त मराठी शुभेच्छा फोटो
Maghi Ganesh Jayanti 2023 : कधी आहे माघी गणेश जयंती? माघी गणेश जयंती का साजरी करतात?
सर्व मॅचचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून सुरू. तिन्ही मॅचसाठी टॉस संध्याकाळी 7 वाजता होणार.