India vs New Zealand 3rd ODI: किवीच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ 219 धावांवर गारद; वॉशिंगटनचं 'सुंदर' अर्धशतक

India vs New Zealand 3rd ODI Live Score Updates : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे एकदिवशीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे खेळला जात आहे. हॅगले ओव्हल मैदानावर होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

IND vs NZ t20 Series 2022: India Team Score Set 220 runs to NZ
किवीच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ 219 धावांवर गारद   |  फोटो सौजन्य: Indiatimes

IND vs NZ t20 Series 2022: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात क्राइस्टचर्च(Christchurch) येथे एकदिवशीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे (ODI) खेळला जात आहे. हॅगले ओव्हल मैदानावर होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार (Captain) केन विल्यमसनने (Kane Williamson) नाणेफेक (toss) जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. परंतु किवीच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ फक्त 219 धावांवर गारद झाला. भारतीय  संघाने 47.03 षटकांमध्ये ऑलऑऊट झाला. (India vs New Zealand 3rd ODI: Indian Cricket team set 220 score for New Zealand)

अधिक वाचा  :  नवरा-बाययकोच्या नात्याची कमकवूत नाळ घट्ट करायची आहे?

पहिला सामना न्युझीलंडने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात पावसाने बॅटिंग केली. आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्या विजय मिळवून भारतीय संघ बरोबरी करण्याचा प्रयत्नात आहे. परंतु किवीच्या गोलंदाजांनी भारतीय फलदांजाचा हा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय संघाच्या फलंदाजांना किवींच्या गोलंदाजांचा सामना करताना नानी आठवली. भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने केल्या. सुंदरने 64 चेंडूचा खेळ करत 51 धावा मिळवल्या. या धावसंख्येत 5 चौकार आणि 1 षटकार त्याने लागवला.  

अधिक वाचा  : 'टोयोटा' इंडियाचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

48 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत वॉशिंग्टन सुंदरने आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. वॉशिंगटनची विकेट भारताची शेवटची विकेट होती.  वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहलने भागीदारी करत  भारताला 200 धावांचा टप्पा पार करुन दिला.  भारताचा सलामीवीर शुभमन गिलने सुरुवातीपासूनच खेळाला हळू सुरुवात केली. सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये गिलला एकही धाव करता आली नाही. पण नंतर गिलने आपली खेळी खेळण्यास सुरुवात केली. त्याने 9व्या षटकात मिल्नेच्या चेंडूवर सुरुवातीला 2 चौकार मारले आणि पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यानंतर भारताचा कर्णधार सलामीवीर शिखर धवन 28 धावा करत बाद झाला. 

सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडकडे 1-0 अशी आघाडी आहे.सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडकडे 1-0 अशी आघाडी आहे. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला वनडे न्यूझीलंडने ७ गडी राखून जिंकला तर दुसरा वनडे पावसामुळे रद्द झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी