IND vs NZ: T20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय, द्रविड ॲन्ड कंपनीला दिला ब्रेक

Team India Coach:टी-20 वर्ल्ड कप 2022 मधून बाहेर पडल्यानंतर अचानक टीम इंडियाचे कोच बदलले आहेत. आगामी न्यूझीलंड दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफला T20 वर्ल्ड कपनंतर ब्रेक देण्यात आला आहे.

IND vs NZ: Team India's coach suddenly changed after defeat in T20 World Cup!
IND vs NZ: T20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय, द्रविड ॲन्ड कंपनीला दिला ब्रेक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे कोच बदलले
  • राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफला ब्रेक
  • न्यूझीलंड दौऱ्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचा कोच असणार

India vs New Zealand Series: T20 World Cup 2022 च्या सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाची अचानक कोचिंग टीम बदलली आहे. आगामी न्यूझीलंड दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफला T20 वर्ल्ड कपनंतर ब्रेक देण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. (IND vs NZ: Team India's coach suddenly changed after defeat in T20 World Cup!)

अधिक वाचा : टॉप प्लेयर्स ब्रेक घेतात, नवे खेळाडू येतात मात्र....सेहवागने केले सवाल

या खेळांडूंना विश्रांती

आता न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ही मालिका वेलिंग्टनमध्ये १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली, सलामीवीर केएल राहुल आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यासोबतच कोचिंग स्टाफलाही टी-20 वर्ल्ड कपनंतर ब्रेक देण्यात आला आहे.

अधिक वाचा : T20 World Cup: या इंग्रज दिग्गजाने टीम इंडियाच्या जखमेवर चोळले मीठ

या दिग्गजाच्या खांद्यावर 

बीसीसीआय (क्रिकेट बोर्ड ऑफ इंडिया) च्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "लक्ष्मणच्या नेतृत्वाखालील एनसीए संघ न्यूझीलंडला जाणारा संघ सामील होईल, ज्यात हृषिकेश कानिटकर (फलंदाजी प्रशिक्षक) आणि साईराज बहुले (गोलंदाजी प्रशिक्षक) यांचा समावेश आहे."

अधिक वाचा : T20 WC:आम्ही स्वप्न पूर्ण नाही करू शकलो मात्र...विराटने लिहिले असे काही...

संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे

लक्ष्मणला भारतीय संघात ही जबाबदारी सोपवण्याची ही पहिलीच वेळ नाही. लक्ष्मणने अखेरचे झिम्बाब्वे आणि आयर्लंड दौऱ्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या घरच्या वनडे मालिकेदरम्यान संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. अष्टपैलू हार्दिक पांड्या टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व करेल, तर अनुभवी सलामीवीर शिखर धवन वनडे संघाचे नेतृत्व करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी