IND vs NZ:भारत-न्यूझीलंड टी20 ट्रॉफी पाहून भडकले युजर्स...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 18, 2022 | 11:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. आज या मालिकेतील पहिला टी20 सामना रंगत आहे. यात टी 20 ट्रॉफीबाबत काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

india vs new
IND vs NZ:भारत-न्यूझीलंड टी20 ट्रॉफी पाहून भडकले युजर्स... 
थोडं पण कामाचं
  • टी20 मालिका सुरू होण्याआधी दोन्ही संघांचे कर्णधार यांनी हातात ट्रॉफी घेऊन फोटोज क्लिक केले
  • दरम्यान, ट्रॉफीची साईज बघून अनेक चाहत्यांनी याची खिल्ली उडवली. 
  • सोशल मीडियावर याचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ(indian cricket team) न्यूझीलंड दौऱ्यावर(new zealand tour) असून टी20 मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांदरम्यान टी 20(t20)आणि वनडे मालिका(one day series) खेळवली जाणार आहे. आज 18 नोव्हेंबरपासून याची सुरूवात होत आहे. यातील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये(welington) खेळवला जाईल. भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे(hardik pandya) देण्यात आले आहे. तर वनडे फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी शिखर धवनकडे(shikhar dhawan) देण्यात आली आहे. यातच टी20च्या ट्रॉफीवरून काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. IND vs NZ trophy memes viral on social media

अधिक वाचा - ठाण्यात छडी लागे छम छम नाटकाचा रंगला प्रयोग 

टी20 वर्ल्डकपचे सेमीफायनलिस्ट

खास बाब म्हणजे दोन्ही संघ हे टी20 वर्ल्डकप 2022च्या सेमीफायनलमध्ये पोहोचले होते. भारताला ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. तर केन विल्यमसन्सच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाला पाकिस्तानने हरवत बाहेरचा रस्ता दाखवला होता. दोन्ही संघ आता वर्ल्डकपनंतर मैदानात उतरत आहेत. 

सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

टी20 मालिका सुरू होण्याआधी दोन्ही संघांचे कर्णधार यांनी हातात ट्रॉफी घेऊन फोटोज क्लिक केले. दरम्यान, ट्रॉफीची साईज बघून अनेक चाहत्यांनी याची खिल्ली उडवली. 

 

अधिक वाचा- मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात,5 जणांचा मृत्यू

वरिष्ठांना आराम

रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर गेली आहे. या मालिकेत विजयी सुरूवात करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. अनेक वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे. टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. यावेळी पांड्याने म्हटले की टी20 वर्ल्डकपमधील निराशा विसरून नव्या मालिकेची सुरूवात करू. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू जबरदस्त तयारी करत आहेत.  

भारत वि न्यूझीलंड वेळापत्रक

18 नोव्हेंबर पहिली T20, वेलिंग्टन
20 नोव्हेंबर दुसरी T20, माउंट मौनगानुई
22 नोव्हेंबर तिसरी T20, ऑकलंड

वनडे मालिका

25 नोव्हेंबर पहिली वनडे, ऑकलंड
27 नोव्हेंबर दुसरी वनडे एकदिवसीय, हॅमिल्टन
30 नोव्हेंबर तिसरी वने, क्राइस्टचर्च

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी