IND vs NZ : वानखेडे कसोटी; 539 धावांवर भारताकडून दुसरा डाव घोषित; न्यूझीलंडला 540 धावांचे आव्हान

India vs New Zealand 2nd Test : भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसरा कसोटी सामना (Second Test match) मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे.  

IND vs NZ 2 ND Wankhede Test
IND vs NZ : न्यूझीलंडला 540 धावांचे आव्हान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस
  • भारतीय संघाच्या पहिल्या डावातील 325 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 62 धावांवर आटोपला.
  • भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला नाही आणि दुसऱ्या दिवसअखेर 332 धावांची आघाडी घेतली.

India vs New Zealand 2nd Test : मुंबई : भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसरा कसोटी सामना (Second Test match) मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे.  आज सामन्याचा तिसरा दिवस असून भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ करत  दुसरा डाव 539  धावांवर घोषित केला आहे. न्यूझीलंडला आता 540 धावा कराव्या लागणार आहेत.

टीम इंडियाने न्यूझीलंडच्या संघाला 540 धावांचे लक्ष्य दिलं आहे. टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात मयंक अग्रवालसह चेतेश्वर पुजारा सलामीला उतरले होते. यावेळी मयंक 62 आणि पुजारा 47 धावांवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल 47 धावा, श्रेयस अय्यर 14 धावा आणि विराट कोहली 36 धावा करून बाद झाला. टीम इंडिया मोठी धावसंख्या बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना एजाज पटेलने दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेत मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. रचिन रवींद्रने 3 विकेट्स घेतले. अखेरीस अक्षर पटेलने 41 धावांची तुफानी खेळी केली.

कोहली-गिलच्या भागीदारीनंतर भारतीय डाव गडगडला

दोन गडी बाद झाल्यानंतरत भारताच्या डावाला संभाळण्यासाठी कर्णधार विराट कोहली (36) आणि शुभमन गिलने (47) धाव केल्या. दोन्ही खेळाडूंनी फटकेबाजी करत भारताला जलदगतीने 150 धावसंख्येवर पोहचवले. दोघांनी 82 धावांची भागादारी केली. रचिन रविंद्रने गिलला लॅथमच्या मदतीने झेलबाद केलं, आणि दोघांची भागीदारी तोडली. गिलने 75 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 47 धावा केल्या. किवी संघाने येथून पुनरागमन केले. पटेलने श्रेयस अय्यरला (१४) यष्टिचित केले. त्यानंतर रचिन रवींद्रने कर्णधार विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले. कोहली बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने धमाकेदार खेळी करत अवघ्या 26 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 41 धावा केल्या. दुसरीकडे, रवींद्रने ऋद्धिमान साहा (13) याला आपला तिसरा बळी बनवला. जयंत यादवला (6) एजाज पटेलने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले आणि त्यानंतरच कोहलीने डाव घोषित केला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने चार तर रचिन रवींद्रने तीन बळी घेतले.

भागीदारी तोडण्यात यशस्वी ठरला एजाज पटेल

डावाच्या 32 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एजाज पटेलने मयंक अग्रवालला विल यंगकडे लॉंग ऑफवर झेलबाद करून भारताला पहिला धक्का दिला.  मयंक अग्रवालची पुजारासोबतची शतकी भागीदारी संपुष्टात आली. अग्रवालने 108 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. ।यानंतर एजाज पटेलने चेतेश्वर पुजाराला (४७) अर्धशतक करण्यापासून रोखले आणि स्लिपमध्ये रॉस टेलरकडे झेलबाद केले.

मयंक-पुजाराची उत्तम जोडी 

मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात भारताला चांगली सुरुवात करून दिली आणि शतकी भागीदारी केली.  दोन्ही फलंदाजांनी वेगाने धावा करण्यावर भर दिला.   अग्रवालने एजाज पटेलच्या डावातील २६व्या षटकातील पहिल्या चेंडूवर अतिरिक्त कव्हरवर षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 90 चेंडूंत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघ यावेळी न्यूझीलंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहे आणि त्यांना आज कसोटी सामना जिंकण्याची संधी आहे. भारताचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ 62 धावांत आटोपला. यजमानांनी न्यूझीलंडला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा दुसरा डाव सुरू ठेवला. 

न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 62 रन्समध्ये गारद

किवी टीमने पहिला डाव सुरू केला तेव्हा सिराजने अप्रतिम गोलंदाजी करत किवींना 3 धक्के दिले. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम, विल यंग आणि रॉस टेलर यांना बाद केले.  न्यूझीलंडच्या पहिल्या डावात संपूर्ण संघ 62 धावांत गारद झाला आणि टीम इंडियाला 263 धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडकडून काइल जेमिसनने 17 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने अप्रतिम गोलंदाजी करताना 4 विकेट्स घेतले. अक्षरने 2, मोहम्मद सिराजने 3, जयंत यादवने 1 बळी घेतला. न्यूझीलंडला 540 धावांचे आव्हान असल्याने भारताला ही कसोटी जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे.

एजाज पटेल यांचा ऐतिहासिक पराक्रम

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने एका डावात सर्व 10 बळी घेत इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर जगातील तिसरा गोलंदाज ठरला.  परदेशी भूमीवर कसोटी डावात १० बळी घेणारा एजाज पटेल जगातील पहिला गोलंदाज ठरला. पटेलने 47.5 षटकात 2 मेडन्ससह 119 धावांत 10 बळी घेतले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी