India vs New Zealand:  भारत-न्यूझीलंड मॅचपूर्वी जाणून घ्या असे असेल नॉटिंघमचे हवामान 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 13, 2019 | 13:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs NZ, World Cup 2019: आज आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्या सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्यादरम्यान हवामानाबाबत अनेक चर्चा होत आहे. जाणून घेऊ कसे असेल वातावरण...

rohit sharma
रोहित शर्मा नॉटिंघममध्ये पीचची पाहणी करताना  |  फोटो सौजन्य: AP

नॉटिंघम : आज आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सामना रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेते. न्यूझीलंडने या वर्ल्ड कपमध्ये आपले तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यांनी तीनही आशियाई संघाना पराभूत केले आहे. यात श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. टीम इंडियाने देखील आपले दोन पैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. आज न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात पावसाची मुख्य भूमिका असणार आहे. नॉटिंघमचे हवामान कसे असेल या संदर्भात गुरूवारी हवामान खात्याने भविष्यवाणी वर्तवली आहे.  ताजे वृत्त हाती आले तेव्हा भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. 

नॉटिंघममध्ये गेल्या दोन दिवसांपासून कमी जास्त पाऊस होत आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की गुरूवारीही पाऊस पडू शकतो. बुधवारी रात्री उशीरापर्यंत या ठिकाणी पाऊस पडत होता. तापमान १० डिग्री ते १४ डिग्रीपर्यंत होते. आज सामन्याच्या दिवशी तापमान ९ डिग्री ते १३ डिग्री सेंटीग्रेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच पाऊसही होत राहणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

या ठिकाणी ताशी ६ ते ८ किलोमीटर वेगाने वारा वाहत आहे आणि ९७ टक्के आर्द्रता असण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन्ही संघाना वाटते की वातावरण बदलावे आणि सामना पूर्ण १०० षटकांचा खेळण्यात यावा. आतापर्यंत वर्ल्ड कपचे ३ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. ही वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक रद्द होणाऱ्या सामन्यांची संख्या आहे. यापूर्वी १९७९ आणि २०१५ ला प्रत्येकी एक-एक सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. 

आयसीसीवर या संदर्भात टीकेची झोड उठवली जात आहे. सर्वांनी प्रश्न उपस्थित केला की पावसामुळे सामना रद्द होतो तर रिझर्व डे का ठेवण्यात आला नाही. या संदर्भात आयसीसीचे सीईओ डेव रिचर्डसन यांनी संगितले की, लीग मॅचेसमध्ये रिझर्व डे नाही, तर नॉक आऊट सामन्यासाठी रिझर्व डे ठेवण्यात आला आहे. लीग सामन्यात रिझर्व डे ठेवणे कठीण आहे. स्पर्धेचा फॉरमॅट लांब लचक असल्याने त्याला अजून लांब खेचणे शक्य नाही असे रिचर्डसन यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
India vs New Zealand:  भारत-न्यूझीलंड मॅचपूर्वी जाणून घ्या असे असेल नॉटिंघमचे हवामान  Description: IND vs NZ, World Cup 2019: आज आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्या सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्यादरम्यान हवामानाबाबत अनेक चर्चा होत आहे. जाणून घेऊ कसे असेल वातावरण...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola