Ind vs Pak weather update: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी कसं आहे वातावरण, टॉस ठरणार निर्णायक

Ind Vs Pak Weather Update: एशिया कपमधील मॅचेसची सुरुवात शनिवार (27 ऑगस्ट) पासून होत आहे. भारताची पहिली मॅच पाकिस्तान सोबत आहे. या मॅचची उत्सुकता जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये आहे. पण या मॅचपूर्वी जाणून घेऊयात काय आहे वेदर रिपोर्ट.

ind vs pak asia cup 2022 match weather update report prediction
Ind vs Pak weather update: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी कसं आहे वातावरण, टॉस ठरणार निर्णायक 
थोडं पण कामाचं
  • एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगणार सामना
  • रविवारी (28 ऑगस्ट) दुबईत होणार मॅच 
  • भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता

Ind Vs Pak Weather Update : एशिया कप 2022 ची सुरुवात 27 ऑगस्ट पासून होत आहे. एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार असून ही मॅच पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्सुक आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई येथे रविवारी (28 ऑगस्ट) सायंकाळी सामना होणार आहे. एशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्सची ही पहिलीच मॅच आहे. पाकिस्तानवर मात करत भारत विजयाचा श्रीगणेशा करण्यास उत्सुक आहे. जाणून घेऊयात या मॅचपूर्वी पीच आणि हवामानाचा अंदाज कसा असणार आहे. (ind vs pak asia cup 2022 match weather update report prediction)

कुठे आणि कधी होणार मॅच 

  1. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच
  2. वेळ आणि दिनांक - शनिवारी 28 ऑगस्ट रोजी, सायंकाळी 6 वाजता 
  3. ठिकाण - दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई 

अधिक वाचा : India vs Pakistan Match Preview Asia Cup 2022 : रविवारी आशिया कप स्पर्धेत भिडणार भारत आणि पाकिस्तान

IND vs PAK Asia Cup match pitch report

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील पीच बॅट्समनसाठी फायदेशीर ठरते. या मॅचमध्येही असंच पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या स्टेडियमवर सरासरी 150 रन्सचा स्कोर आहे आणि टॉस जिंकणारा कॅप्टन हा आधी बॉलिंग करण्यास प्राधान्य देतो. फास्ट बॉलर्ससाठीही पीचवरुन चांगला बाऊन्स मिळण्याची अपेक्षा असते. सुरुवातीला ओलावा सुकल्याने दुसऱ्या इनिंगच्या बॅट्समनला त्याचा अधिक फायदा होतो.

अधिक वाचा : Ind Vs Pak Match Preview: दिवाळीला ‘मोती’ तसा भारत-पाकिस्तान मॅचसाठी ‘मौका’, पुन्हा आठवल्या या सदाबहार जाहीराती

IND vs PAK Asia Cup match weather report

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच दरम्यान हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे. मॅचच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. दुबईच्या वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता मॅच सुरू होणार आहे.

प्लेअर्सला त्रासदायक

मॅचच्या दिवशी दुबईतील तापमान हे 40 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या सुमारास कडाक्याचं ऊन असणार आहे. रात्री तापमानात घसरण होईल. मात्र, हवामानामुळे प्लेअर्सला थोडा त्रास होऊ शकतो. ही मॅच अंतिम टप्प्यात पोहोचल्यावर त्यावेळी प्लेअर्सला उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल. मॅच दरम्यान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी