Asia Cup 2022 IND vs PAK : रोहित शर्माने टॉस जिंकला तर समजून जा की...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 27, 2022 | 09:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Asia cup: आशिया कपमध्ये २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यातील टॉस महत्त्वाचा आहे. 

rohit sharma
IND vs PAK : रोहित शर्माने टॉस जिंकला तर समजून जा की... 
थोडं पण कामाचं
  • आशिया कपची सुरूवात २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये होत आहे.
  • पहिल्या दिवशी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार
  • २८ ऑगस्टला दुबईत होणार भारत-पाकिस्तान यांच्यात सामना

मुंबई: आशिया कप २०२२ची(asia cup 2022) सुरूवात होण्यास अवघे काही तासच शिल्लक आहेत. आशिया कपमध्ये दुसरा सामना भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यात रंगणार आहे. संपूर्ण क्रिकेट रसिकांना या सामन्याची उत्सुकता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया(team india) आणि बाबर आझमच्या(babar azam) नेतृत्वात पाकिस्तानचा संघ या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटल्यावर फिव्हर नेहमीच हाय असतो. टी-२० वर्ल्डकप २०२१ नंतर साधारण दहा महिन्यांनी हे संघ पुन्हा आमने सामने येत आहेत. खास बाब म्हणजे दहा महिन्यांआधी ज्या मैदानावर पाकिस्तानी संघाने टीम इंडियाला हरवल होते. त्याच मैदानावर हा सामना रंगत आहे ते म्हणजे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम. (IND vs PAK : If rohit sharma won the toss then...)

अधिक वाचा - कुटुंबातील पाच जणांचा खून केल्यानंतर युवकाची आत्महत्या

मात्र त्याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरु होणार तुम्ही टॉसच्या भूमिकेबाबत सविस्तर जाणून घ्या. 

टीम इंडिया लक्ष्य गाठताना जास्त सामने जिंकलीये

खरंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमध्ये १४ सामने खेळले आहेत. यातील ८ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत तर पाच सामन्यांत पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर एक सामना रद्द झाला होता. म्हणजेच टीम इंडियाचे पारडे जड आहे. मात्र टीम इंडियाने जे ८ सामने जिंकलेत त्यापैकी सहा वेळा नंतर फलंदाजी करताना सामने जिंकलेत. तर दोनच वेळा असे घडलेय की भारताने पहिल्यांदा फलंदाजी करून सामने जिंकलेत. तर पाकिस्तानने जे पाच सामने जिंकलेत त्यात चार वेळा पहिल्यांदा फलंदाजी केली. तर एकच सामना असा जिंकलाय की त्यात त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना सामना जिंकलाय.

टीम इंडियाने लक्ष्य गाठताना अनेक सामने आपल्या नावावर केलेत. म्हणजेच जेव्हा २८ ऑगस्टला भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टॉससाठी येतील तेव्हा त्यांच्या मनातही हे आकडे जरूर असतील. त्यामुळे जे कर्णधार टॉस जिंकले तो याच हिशेबाने निर्णय घेईल. 

अधिक वाचा - स्कूल युनिफॉर्ममधल्या 'या'दबंग अभिनेत्रीला ओळखलंत?

भारत पाकिस्तान हेड टू हेड

आता तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत जे टी-२० सामने खेळले गेलेत त्यांचे आकडे काय आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारत आणि पाकिस्तान ९ वेळा आमने सामने आलेत यात सात वेळा टीम इंडियाचा विजय झाला तर फक्त दोनच वेळा पाकिस्तानचा संघ जिंकला आहे. या दोन सामन्यांपैकी एक सामना तो जो २०२१च्या वर्ल्डकपमध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा टीम इंडियाला दहा विकेटनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी