India Vs Pak Match Preview : काही घटना आणि त्याच्याशी संबंधित जाहीराती यांचं घट्ट नातं असतं. व्यवसाय आणि फायद्यातोट्याची गणितं यापलिकडे काही जाहीराती जातात आणि त्या जाहीराती सर्वसामान्यांच्या मनात घर करून राहतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना (India Vs Pakistan match) हा दोन्ही देशातील नागरिकांसाठी सर्वोच्च आनंदाचा आणि उत्कंठेचा प्रवास असतो. दोन्ही देशात सामना रंगण्यापूर्वी काही दिवस वातातवणनिर्मिती व्हायला सुरुवात होते आणि काही जाहीराती (Advertisements) त्यासाठी हातभार लावतात. यावेळीदेखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 तारखेला सामना रंगणार असून दोन्ही देशांचे खेळाडू आपली सर्व शक्ती आणि कसब पणाला लावून खेळणार आहेत. त्यामुळे यावेळचा सामनादेखील चुरशीचा होईल, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा काही जाहीराती चर्चेत आल्या आहेत.
भारत पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष मैदानात सामना सुरू होण्यापूर्वी तो प्रत्येकाच्या मनात सुरू होत असतो. हा सामना केवळ बॅट आणि बॉलनेच नाही, तर जाहीरातींद्वारेदेखील खेळला जातो. भारत आणि पाकिस्तानचा सामना असेल, तर त्याबाबतच्या अनेक क्रिएटिव्ह जाहीराती बाजारात येत असतात आणि लोक त्यांना डोक्यावर घेतात. काही वर्षांपूर्वी आलेली अशीच एक जाहीरात म्हणजेच ‘मौका-मौक”.
मौका-मौका या जाहीरातीत पाकिस्तानातील एक नागरिक विजयाचा आनंद साजरा करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं. त्याने फटाके तयार ठेवले आहेत आणि पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडण्याचं त्यानं ठरवलं आहे. मात्र अनेक वर्ष जाऊनही पाकिस्तान काही भारताविरुद्ध सामना जिंकत नाही आणि त्याला फटाके उडवण्याचा ‘मौका’ कधीच मिळत नाही. त्याचं तारुण्यही सरतं आणि त्याचा मुलगा आता पाकिस्तान जिंकण्याची वाट पाहू लागतो, असं दाखवत भारतीय प्रेक्षकांना जोरदार चिअर-अप करण्याचा प्रयत्न या जाहीरातीतून करण्यात आला आहे.
या जाहीरातीत एक पाकिस्तानी वडील त्याच्या मुलाला प्रयत्नांची महती सांगत असतात. आपण प्रयत्न करत राहायचं, कधी ना कधी यश मिळतंच, असं आपले वडील सांगायचे असं तो म्हणतो. त्यावर भारतीय जर्सी घातलेली एक व्यक्ती विचारते की आपण असं कधी म्हणालो? या जाहीरातीतून भारत हाच पाकिस्तानचा बाप आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या जाहीरातीत सर्व मोह बाजूला ठेऊन संन्यास घ्यायला आलेला तरुण दिसतो. पैसा, प्रतिष्ठा, नोकरी, संपत्ती असे सर्व मोह टाळून तो संन्यास घेतो आणि आश्रमात पोहोचतो. मात्र तिथे ठेवलेल्या वर्तमानपत्रात आझच भारत-पाकिस्तान मॅच असल्याची जाहीरात त्याला दिसते आणि आश्रमातून तो पळ काढून घरची वाट धरतो. आयुष्यात सगळे मोह सुटतात, मात्र भारत-पाकिस्तान मॅच पाहण्याचा मोह काही सुटू शकत नाही, हेच या जाहीरातीतून दाखवण्यात आलं आहे.