IND vs SA 3rd ODI: भारतीय संघासाठी प्रतिष्ठेची लढाई; संघात होऊ शकतात मोठे बदल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 23, 2022 | 12:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA 3rd ODI Today | सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कदिवसीय मालेकचा थरार रंगला आहे. पहिल्या दोन सामन्यातील दारूण पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात यजमान आफ्रिकेचा विजयरथ रोखण्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल केले जाऊ शकतात.

 IND vs SA 3rd ODI The challenge for the Indian team to avoid a clean sweep in the series
भारतीय संघासाठी प्रतिष्ठेची लढाई  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील तिसरा एकदिवसीय सामना आज होणार आहे.
  • पहिल्या दोन्ही सामन्यातील पराभवामुळे शेवटचा सामना भारतीय संघासाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.
  • त्यामुळे तिसऱ्या सामन्यात यजमान आफ्रिकेचा विजयरथ रोखण्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल केले जाऊ शकतात.

IND vs SA 3rd ODI Today | केपटाउन : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) एकदिवसीय मालेकचा (One Day Series) थरार रंगला आहे. पहिल्या दोन सामन्यातील दारूण पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात यजमान आफ्रिकेचा विजयरथ रोखण्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल केले जाऊ शकतात. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी केपटाउन येथे होणार आहे. पहिल्या दोन्हीही सामन्यातील भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे अयशस्वी ठरली. प्रमुख फलंदाज मधल्या काही षटकात सन्मानजनक भागीदारी करण्यात फेल ठरले. तसेच जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) अपवाद वगळला तर बाकी सर्व भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्या दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी केवळ ७ बळी घेतले. पहिल्या सामन्यात चार आणि दुसऱ्या सामन्यात तीन बळी पटकावले. त्यामुळे भारतीय गोलंदांज आफ्रिकन फलंदाजांवर दबाव राखून ठेवण्यात अपयशी ठरले. (IND vs SA 3rd ODI The challenge for the Indian team to avoid a clean sweep in the series).  

अधिक वाचा : काय आहे रेल्वेच वेळापत्रक; कुठे मेगा ब्लॉक, कुठे वाहतूक रद्द

भारतीय गोलंदाजांना आव्हान देता आले नाही

रविचंद्रन अश्विन आणि खासकरून भुवनेश्वर कुमार सारखे अनुभवी गोलंदाज रासी व्हॅन डर डसेन, जानेमन मलान आणि क्विंटन डी कॉक यांसारख्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना आव्हान देऊ शकले नाहीत. हे गोलंदाज पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुढील सामन्यात जयंत यादव आणि दीपक चाहर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतात. पहिले दोन्ही सामने बोलँड पार्क येथे खेळले गेले जिथे गोलंदाजांनी कमी गती आणि कमी बाउंस मिळतो. कर्णधार लोकेश राहुलला देखील याची कल्पना आहे की या खेळपट्टीवरील बरिचशी परिस्थिती भारतीय मैदानांच्या खेळपट्टीला मिळती जुळती आहे. यानंतर देखील भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. आगामी तिसरा सामना केपटाउनमध्ये होणार आहे, मात्र भारताला ही मालिका ०-३ अशी गमावू नये यासाठी अस्तित्वाची लढाई करावी लागणार आहे. 

पहिल्या दोन्ही सामन्यांत कर्णधार राहुल फेल

कर्णधार के.एल राहुलसाठी पहिल्या कसोटीतील शतक वगळले तर हा दौरा आतापर्यंत निराशादायक ठरला आहे. त्याच्याकडे संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून बघितले जाऊ शकते परंतु आतापर्यंत त्याने आपल्या नेतृत्व कौशल्याने काही खास प्रभावित केलेले नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधारपदाव्यतिरिक्त राहुलने फलंदाजीतही निराशा केली. एकदिवसीय सामन्यांमध्ये आवश्यक मानला जाणारा स्ट्राईक रोटेट करण्यात देखील तो अपयशी ठरला. त्यामुळे मागच्या फळीतील फलंदाजांवर दबाव वाढत गेला. 

रोहित शर्माच्या संघातील पुनरागमनानंतर लोकेश राहुलला संघातील अव्वल स्थान गममावे लागू शकते कारण गब्बर शिखर धवनने पुनरागमन करताना चांगला फॉर्म दाखवल्यामुळे राहुलच्या वरच्या फळीतील फलंदाजीवर टांगती तलवार येऊ शकते. विराट कोहलीने पहिल्या सामन्यात ५१ धावा केल्या मात्र त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आले होते आणि मैदानावर त्याची पहिल्या सारखी ऊर्जा दिसली नाही. यासोबतच दोन्ही अय्यर श्रेयस आणि व्यंकटेश देखील आतापर्यंत काही प्रभाव पाडू शकले नाहीत. जो भारतीय ड्रेसिंग रूममसाठी चिंतेचा विषय बनला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी