Ind vs SA 3rd Test: Capetown कसोटीत भारताला इतिहास रचण्याची संधी, सामन्याच्या महत्त्वाच्या बाबींसह जाणून घ्या Capetown चे हवामान

भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यीतील कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आफ्रिकेच्या केपटाउन (Cape Town) येथे मंगळवारपासून सुरू होत आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत आहे.

Ind vs SA 3rd Test
Capetown कसोटीत भारताला इतिहास रचण्याची संधी,  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • तिसरा कसोटी सामना मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरु होईल.
  • पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) वर्चस्व गाजवले तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने लढा देत रोमहर्षक विजय मिळवला.
  • टीम इंडियाने हा सामना जिंकताच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल.

Ind vs SA match Weather Update  :  नवी दिल्ली  : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यीतील कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आफ्रिकेच्या केपटाउन (Cape Town) येथे मंगळवारपासून सुरू होत आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) वर्चस्व गाजवले तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने लढा देत रोमहर्षक विजय मिळवला. यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.

कारण ही कसोटी जिंकताच भारत मालिकाही जिंकेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल. पण केपटाऊनमधला हा विजय भारताला सोपा नसून आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. याशिवाय येथील हवामान देखील भारतीय संघासाठी अडचणी उभ्या करू शकते. 

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरु होईल. नाणेफेक दुपारी 1.30 वाजता असेल. दुपारी सुरू होणाऱ्या सामन्यात हवामान अडचणी आणू शकतो. चला तर जाणून घेऊ हवाामानाची माहिती. या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे.

कसे असेल केपटाउनचे  हवामान

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत पावसाचा व्यत्यय विशेषतः पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (11 जानेवारी) पाहायला मिळू शकतो. याशिवाय आर्द्रता देखील खूप जास्त असण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे या कसोटी सामन्यात पावसाची शक्यता जास्त राहू शकते. हवामानाशी संबंधित वेबसाइट Accuweather.com नुसार केप टाउनमध्ये सामन्याच्या पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणासह पावसाचीही शक्यता आहे. पावसामुळे पहिल्या सत्रातील खेळ म्हणजेच दुपारच्या जेवणापूर्वीचा खेळ खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्यानंतर हवामान साफ होईल. 

सामन्याच्या अन्य दिवसाच्या हवामानाच्या अंदाजाबद्दल बोलायचे तर 11 जानेवारी रोजी पावसाची 64 टक्के शक्यता आहे. यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी, 12 आणि 13 जानेवारी रोजी, पावसाची शक्यता नाही. चौथ्या दिवशी 14 जानेवारीला केवळ एक टक्का पाऊस अपेक्षित आहे. तर 15 जानेवारी, म्हणजेच पाचव्या दिवशी केवळ 19 टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता आहे. अशाप्रकारे सामन्याचा पहिला दिवस वगळता उर्वरित चार दिवस हवामान स्वच्छ राहील.

सामन्यातील काही महत्त्वाच्या बाबी

दरम्यान केप टाउनच्या न्यूलँड्स मैदानावरील खेळपट्टी बहुतेक वेगवान गोलंदाजांना मदत करते. बाऊन्स आणि सीम-मुव्हमेंटमुळे फलंदाजांचे खेळणे कठीण होईल. तसेच न्यूलँड्स हे काही मैदानांपैकी एक आहे, जे फिरकीपटूंनाही उपयोगी आहे. त्यामुळे रविचंद्रन अश्विन आणि केशव महाराज यांनाही कसोटी सामन्यात बॉलबे योगदान देण्याची संधी मिळू शकते. न्यूलँड्सचे मैदान एका बाजूला पर्वतांनी वेढलेले आहे. त्यामुळे येथील विकेट वेगवान गोलंदाजांना फायदेशीर ठरते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी 124 तर फिरकी गोलंदाजांनी 34 विकेट घेतल्या आहेत.
नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक न झळकावलेल्या कोहलीला या सामन्यात आपला दुष्काळ संपवायचा आहे.

कोहलीच्या अपेक्षित पुनरागमनाव्यतिरिक्त, भारताला चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे, तसेच मोठ्या भागीदारी उभारणे आवश्यक आहे. जोहान्सबर्गमध्ये, कर्णधार केएल राहुलने पहिल्या डावात अर्धशतक पूर्ण केले परंतु सेंच्युरियनमध्ये केलेल्या खेळाप्रमाणे त्याला मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करता आले नाही. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी धमाकेदार अर्धशतके झळकावली असली तरी ही वरिष्ठ फलंदाजी जोडी अद्याप पूर्ण फॉर्ममध्ये नाही. जोहान्सबर्गमध्ये दुसऱ्या डावात खराब शॉट मारून बाद झालेला ऋषभ पंत यावेळी चांगला खेळ दाखवेल, अशी आशाही संघाला असेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी