IND vs SA 5th T20 : भारत-द. आफ्रिका पाचवी टी २० पावसामुळे रद्द, मालिका बरोबरीत संपली

IND vs SA 5th T20 abandoned : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी २० सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

IND vs SA 5th T20 abandoned
भारत-द. आफ्रिका पाचवी टी २० पावसामुळे रद्द, मालिका बरोबरीत संपली 
थोडं पण कामाचं
  • भारत-द. आफ्रिका पाचवी टी २० पावसामुळे रद्द, मालिका बरोबरीत संपली
  • मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने आणि नंतरचे दोन सामने भारताने जिंकले
  • मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना पावसामुळे रद्द

IND vs SA 5th T20 abandoned :  बंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी २० सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने आणि नंतरचे दोन सामने भारताने जिंकले. यामुळे पाचव्या सामन्याचे महत्त्व वाढले होते. पण पावसामुळे निर्णायक सामना रद्द झाला.

पावसाचा व्यत्यय येण्याआधी नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने ३.३ षटकांत २ बाद २८ धावा केल्या होत्या. सलामीवीर ईशान किशन १५ धावा करून लुंगी एनगिडीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झला होता. ऋतुराज गायकवाड १० धावा करून लुंगी एनगिडीच्या चेंडूवर प्रीटोरियसकडे झेल देऊन परतला होता. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे दोघे खेळत होते. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - पाच टी २० सामन्यांचा निकाल

  1. ९ जून २०२२ - पहिला सामना - दिल्ली - द. आफ्रिकेचा सात गडी राखून विजय
  2. १२ जून २०२२ - दुसरा सामना - कटक - द. आफ्रिकेचा चार गडी राखून विजय
  3. १४ जून २०२२ - तिसरा सामना - विशाखापट्टणम - भारताचा ४८ धावांनी विजय
  4. १७ जून २०२२ - चौथा सामना - राजकोट - भारताचा ८२ धावांनी विजय
  5. १९ जून २०२२ - पाचवा सामना - बंगळुरू - पावसामुळे रद्द

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी