IND vs SA: आज अशी असू शकते भारत आणि द. आफ्रिकेची प्लेईंग ११

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 09, 2022 | 14:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA 1st T20 Dream11 Team Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्लीमध्ये होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात कोणता संघ कोणत्या खेळाडूंना उतरू शकतो. 

team india
IND vs SA: आज अशी असू शकते भारत आणि द. आफ्रिकेची प्लेईंग ११ 
थोडं पण कामाचं
  • भारत वि दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना
  • कोणता संघ कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरू शकतो
  • नवा कर्णधार ऋषभ पंत कोणत्या खेळाडूंना देऊ शकणार संधी

मुंबई: आज जेव्हा दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये(arun jaitley stadium) संध्याकाळी ७ वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे टी-२० संघ(india vs south africa t-20 teams) मैदानात उतरतली तेव्हा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जलवा आणि चांहत्यांमधील याची उत्सुकता पुन्हा पाहायला मिळेल. दिल्लीचा उन्हाळा यंदा साऱ्यांनाच त्रस्त करत आहे मात्र चाहत्यांचा जोशही शिखरावर आहे आणि मैदान खचाखच भरेल. सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे की कोणत्या ११ खेळाडूंना मैदानावर उतरणार आहेत. काय असणार आहे त्याची पसंत?IND vs SA first t-20 playing 11 player

अधिक वाचा - तुम्हालाही स्वप्नात मृत पूर्वज दिसतात? जाणून घ्या याचे कारण

टीम इंडियाचा कर्णधार पुन्हा एकदा बदलला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे त्याच्या जागी केएल राहुलला नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र बुधवारी त्याला दुखापत झाल्याने आता ऋषभ पंतकडे नेतृत्व देण्यात आले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता प्लेईंग ११वर असतील. 

याशिवाय ओपनिंगवरून समस्या उभी राहिली आहे कारण संघाचे दोन मुख्य ओपनर रोहित आणि राहुल यावेळेस संघात नाही आणि शिखर धवनलाही निवडण्यात आलेले नाही. या स्थितीत ऋतुराज आणि इशान किशनसोबत टीम जाणार की द्रविड-पंत नव्या जोडीसह प्रयोग करणार आहेत. 

आफ्रिकेच्या संघाबाबत बोलायचे झाल्ास त्यांच्या अधिकतर खेळाडूंना प्लेईंग ११मध्ये संधी दिली जाऊ शकते ज्यांनी आयपीएलमध्ये धमाल केली. सगळ्यात वरती त्या दोन खेळाडूंचे नाव आहे ते आहेत क्विंटन डी कॉक आणि डेविड मिलर. आता हे पाहावे लागेल की केशव महाराज आणि तबरेज शम्सी कोणत्या गोलंदाजासोबत जाता. 

अधिक वाचा - NEET PG 2022 स्कोअरकार्ड जाहीर

असे असू शकतात भारत आणि दक्षिण आफ्रिका प्लेईंग ११चे संघ

टीम इंडिया 

ऋषभ पंत (कर्णधार), रुतुराज गायकवाड़, ईशान किशन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल.

दक्षिण अफ्रीका

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रासी वान डेर डुसेन, एडेन मार्कराम, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्किया, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, मार्को येनसेन, तबरेज़ शम्सी आणि केशव महाराज. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी