IND vs SA: दौरा सुरू होण्याआधी द. आफ्रिकेने दिली गुडन्यूज, भारतीय संघ होईल खुश

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 15, 2021 | 17:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

team india tour in south africa: द. आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला खुशखबर मिळाली आहे. आफ्रिकेत पोहोचल्यानंतर त्यांना कोरोनाचे कडक नियम पाळण्याची गरज नाही.

team india
IND vs SA: दौरा सुरू होण्याआधी द. आफ्रिकेने दिली गुडन्यूज 
थोडं पण कामाचं
  • भारत द. आफ्रिका दौऱ्यासाठी १६डिसेंबरला रवाना
  • या दौऱ्यात ३ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळणार
  • आफ्रिकेत टीम इंडियाची कोविड १९ची चाचणी केली जाणार

मुंबई:  दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी(south africa tour) रवाना होण्याआधी टीम इंडियाला(team india) मोठा दिलासा मिळाला आहे. येथे द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की टीम इंडियाला कडक नियम पाळण्याची गरज नाही. भारतीय संघ या दौऱ्यासाठी १६ डिसेंबरला रवाना होत आहे. द. आफ्रिकेने म्हटले आहे की भारतीय संघाला एक दिवस क्वारंटाईन(quarantine) राहावे लागेल. यावेळी त्यांची कोविड १९ची चाचणी केली जाईल. सर्व निकाल निगेटिव्ह आल्यास त्यांना आयसोलेशनच्या बाहेर जाण्याची परवानगी मिळेल. विशेष म्हणजे भारतीय संघ सध्या मुंबईत तीन दिवसांच्या क्वारंटाईन पिरियडमध्ये आहे. IND vs SA:  good news for team India before south India tour

इंडसाई़ स्पोर्टच्या रिपोर्टनुसार भारतीय टीम चार्टर्ड फ्लाईटने द. आफ्रिकेला रवाना होणार आहे. तेथे पोहोचताच ती बायोबबलमध्ये सामील होईल. या दरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाणार आहे. इतकंच नव्हे तर टीम ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहे तेथील स्टाफचीही दररोज कोरोना टेस्ट केली जाणार आहे. दोन्ही संघादरम्यान सुरूवातीला कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू होणार. पहिला दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता. मात्र ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटमुळे यात बदल करण्यात आला. 

खेळाडूंसोबत कुटुंबीय नसणार

क्रिकेट द. आफ्रिकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले, टीम इंडियाचे खेळाडू द. आफ्रिकेला पोहोचताच सरळ क्वारंटाईनमध्ये सामील होतील. टेस्टचे निकाल जाहीर होताच त्यांना क्वारंटाईनमधून रिलीज केले जाईल. कोरोना टेस्टचे रिझल्ट येण्यासाठी एक दिवसापेक्षा जास्त दिवस लागणार नाहीत. या दौऱ्यादरम्यान भारतीय खेळाडूंच्या कुटुंबातील कोणताही सदस्य असणार नाही. जर सगळं काही चांगलं असेल तर भारतीय संघ १९ डिसेंबरपासून सराव सुरू करणार.

द. आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान..साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

२६-३० डिसेंबर पहिली कसोटी, सेंच्युरियन
३ ते ७ जानेवारी दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग
११-१५ जानेवारी तिसरी कसोटी, केपटाऊन

१९ जानेवारी पहिली वनडे, पार्ल
२१ जानेवारी दुसरी वने, पार्ल
२३ जानेवारी तिसरी वनडे, केपटाऊन


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी