IND vs SA : तिसऱ्या कसोटीत विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये हे ३ करणार बदल; या खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 09, 2022 | 18:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa Test Series | भारताय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तिथे भारताला यजमान आफ्रिकन संघासोबत ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. आतापर्यंत कसोटी मालिकेतील २ सामने झाले आहेत. पहिल्या दोन सामन्यातील पहिल्या सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. त्यामुळे आता मालिकेत दोन्हीही संघानी १-१ अशी बरोबरी साधली आहे.

IND vs SA In the third Test match Virat Kohli will make these 3 changes in the playing XI to show these players the way out of the team
तिसऱ्या कसोटीत विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये करणार बदल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.
  • विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आफ्रिकेच्या धरतीवर इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
  • दुसऱ्या कसोटी सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहलीलाच बाहेर बसावे लागल्याने त्याच्या जागी विकेटकिपर फलंदाज के.एल राहुलने संघाची कमान सांभाळली होती. मात्र अलीकडेच कोहली नेटमध्ये सराव करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यामुळे किंग कोहलीचे तिसऱ्या सामन्यात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

India vs South Africa Test Series | नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. (India Tour Of South Africa) तिथे भारताला यजमान आफ्रिकन संघासोबत ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. आतापर्यंत कसोटी मालिकेतील २ सामने झाले आहेत. पहिल्या दोन सामन्यातील पहिल्या सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. त्यामुळे आता मालिकेत दोन्हीही संघानी १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता मालिकेतील निर्णायक आणि शेवटचा कसोटी सामना केपटाउनमध्ये (Cape Town) खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेतील शेवटचा सामना दोन्हीही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. भारताला हा तिसरा सामना जिंकून आफ्रिकन धरतीवर इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे भारतीय संघ मागच्या सामन्यातील चुका विसरून नव्या विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल. (IND vs SA In the third Test match Virat Kohli will make these 3 changes in the playing XI to show these players the way out of the team). 

१. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

मुंबईकर २७ वर्षीय युवा फलंदाज श्रेयस अय्यरने अलीकडेच न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये अविस्मरणीय पध्दतीने पदार्पण केले होते. अय्यरने आपल्या पदार्पणाच्याच सामन्यात शानदार फलंदाजी करून १०५ धावांची शतकीय खेळी केली होती. त्यानंतर अय्यरला फलंदाजीमध्ये कोहलीच्या जागी फलंदाजीसाठी घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र नंतर त्याची तब्येत ठिक नसल्याने हनुमा विहारीला ते स्थान देण्यात आले. त्यामुळे आगामी सामन्यासाठी आता रहाणेऐवजी अय्यरचा संघात समावेश केला जाऊ शकतो. अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. त्याचं मोठं कारण म्हणजे रहाणे बऱ्याच दिवसांपासून त्याच्या फॉर्ममध्ये नाही. रहाणे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ० धावा करून बाद झाला होता. मात्र त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात ५८ धावांची साजेशी खेळी केली. तरीदेखील कर्णधार कोहली तिसऱ्या कसोटीत रहाणेला डच्चू देऊन युवा अय्यरला संधी देऊ शकतो.  

२. इशांत शर्मा (Ishant Sharma)

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आफ्रिकेच्या धरतीवर इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीला कर्णधार कोहली आपल्या हातून कदापि न जाऊ देण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारतीय संघ तिसरी आणि शेवटची कसोटी जिंकण्याच्या रणनीतीत कोणतीही कमतरता ठेवणार नाही. लक्षणीय बाब म्हणजे मालिकेतील दुसऱ्या कसोटीत हैदराबादचा २७ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दुखापत झाल्याने त्याला गोलंदाजी करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे आगामी तिसऱ्या कसोटी सामन्यात सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे कर्णधार कोहली दिल्लीचा ३३ वर्षीय अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माला तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. अशीही चर्चा सर्व क्रिकेट तज्ञ आणि क्रिकेट चाहते करत आहेत. आपल्या कसोटी कारकिर्दीत इंशातने १०५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून खेळताना आतापर्यंत ३११ बळी घेतले आहेत.

३. विराट कोहली (Virat Kohli)  

दुसऱ्या कसोटी सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहलीलाच बाहेर बसावे लागल्याने त्याच्या जागी विकेटकिपर फलंदाज के.एल राहुलने संघाची कमान सांभाळली होती. मात्र अलीकडेच कोहली नेटमध्ये सराव करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यामुळे किंग कोहलीचे तिसऱ्या सामन्यात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या कसोटीत विराटच्या जागी हनुमा विहारीला खेळवण्यात आले होते. दरम्यान मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात कर्णधार कोहलीचे पुनरागमन पूर्णपणे निश्चित मानले जात आहे. त्यानंतर आता तिसर्‍या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोहली आणि संघ व्यवस्थापनाने हे बदल केले तर संघाच्या कामगिरीवर आणि सामन्याच्या निकालावर किती परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी