IND vs SA: भारताचा ड्रेसिंगरूम २ ग्रुपमध्ये विभागला गेलाय, या पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 21, 2022 | 15:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa: भारताला पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. लोकेश राहुलच्या नेतृत्वात उतरलेली टीम इंडियाची कमकुवत बाजू पुन्हा या सामन्यात समोर आली. 

Kohli-rahul
भारताचा ड्रेसिंगरूम २ भागात विभागला, पाक क्रिकेटरचा दावा 
थोडं पण कामाचं
  • भारताचा ड्रेसिंग रूम २ ग्रुपमध्ये विभागलाय
  • पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाचा दावा
  • भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान दिसले होते चित्र

मुंबई: भारताला पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून(India vs South Africa) ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया(team india) पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. यावेळी टीम इंडियाची कमकुवत बाजू पुन्हा समोर आली. या  विजयासह यजमान संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज दानिश कनेरियाने(pakistan cricketer danish kaneria) एक वादग्रस्त दावा केला आहे.IND vs SA: India's dressing room divided in 2 groups says former pak cricketer danish kaneria

त्याचे म्हणणे आहे की सामन्यादरम्यान भारताचा ड्रेसिंग रूम(dressing room) दोन भागांमध्ये विभागला गेला होता. आपले यूट्यूब चॅनेलवर कनेपरिया म्हणाला, सामन्यादरम्यान आम्ही पाहिले की भारताचा ड्रेसिंग रूम दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. 

लोकेश राहुल आणि विराट कोहली(Virat Kohli) वेगवेगळे बसले होते. सोबतच कोहली त्या मूडमध्येही दिसत नव्हता जसे तो कॅप्टन असताना दिसत असे. मात्र तो टीममॅन आहे आणि लवकरच मजबुतीने पुनरागमन करेल. लोकेश राहुल भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार आहे. मात्र कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो या मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. नुकतेच कोहलीने आपले कसोटी कर्णधारपद सोडले होते. तर डिसेंबरमध्ये त्याच्याकडून वनडेचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. 

धवन, कोहली आणि ठाकूरव्यतिरिक्त बाकी ठरले फेल

पहिल्या वनडे सामन्याबाबत बोलायचे झाल्यास कर्णधार टेम्बा बावुमा आणि रासी वान डूर डुसैनच्या शतकीय खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने ५० षटकांत ४ बाद २९६ धावा केल्या होत्या. १८व्या ओव्हरमध्ये ६८ धावांवर ३ विकेट पडल्यानंतर चौथ्या विकेटसाठी या जोडीने २०४ धावा केल्या होत्या. दरम्यान टीम इंडिया यजमानांनी दिलेले हे लक्ष्य गाठू शकली नाही.

शिखर धवन(७९) आणि विराट कोहली(५१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावा केल्या होत्या. मात्र ही जोडी तुटल्यानंतर भारतीय संघाची लय बिघडली. दरम्यान, शार्दूल ठाकूरने नाबाद ५० धावांची खेळी करत भारताला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी