India vs South Africa | पर्ल : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील (India vs South Africa) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (One Day Series) दुसरा सामना पर्ल (Parl) येथे शुक्रवारी खेळवला जाणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना 'करो या मरो' असाच असणार आहे.(IND vs SA Playing XI in the 2nd one day match Who will get a chance in Ruturaj Gaikwad and Suryakumar).
भारतीय संघाला आपले मालिकेतील आव्हान कायम ठेवायचे असेल तर या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. जर भारताचा दुसऱ्याही सामन्यात पराभव झाला तर संघाला सामन्यासोबतच मालिकेलाही मुकावे लागेल. मात्र भारताने पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेऊन विजय मिळवला तर मालिकेत १-१ अशी बरोबरी होईल आणि भारताचे मालिकेतील आव्हान कायम राहिल. लक्षणीय बाब म्हणजे के.एल राहुलच्या संघाला दुसऱ्या सामन्यात यजमान आफ्रिकेला चितपट करण्यात यश आले तर मालिकेतील तिसरा सामना फायनल प्रमाणे होईल.
तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना केपटाउन येथे होणार आहे. तत्पुर्वी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात एक-दोन बदल होण्याची शक्यता आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार के.एल राहुल (Captain KL Rahul) मागच्या सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या काही खेळाडूंना संधी देऊ शकतात.
कर्णधार राहुलला या सामन्यात किमान एक बदल करायला नक्कीच आवडेल. कारण पहिल्या सामन्यात त्याने व्यंकटेश अय्यरला गोलंदाजी दिली नाही. केवळ पाच अनुभवी गोलंदाजांवर विश्वास दाखवला होता. अशा स्थितीत पर्ल येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तो सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश करू शकतात. अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
अधिक वाचा : PHOTOS: वाढदिवसाला टीम इंडियाच्या या क्रिकेटरने केला साखरपुडा
सुर्यकुमारचा संघात समावेश झाल्यास तो चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. पहिल्या सामन्यात ऋषभ पंतने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याचवेळी गायकवाडला संघात स्थान मिळाल्यास तो शिखर धवनसोबत सलामीवीर म्हणूनही दिसू शकतो. अशा स्थितीत राहुल मधल्या फळीत खेळताना दिसू शकतो. राहुलने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी केली होती. तेव्हा त्याने अर्धशतक आणि एक शतक झळकावले होते.
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात मधल्या फळीतील फळीही ढासळली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे कसोटी मालिकेत चांगली खेळी करू शकले नाहीत. तर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी एकदिवसीय सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. ही परिस्थिती पाहून माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ संघात अतिरिक्त फलंदाजाचा समावेश करण्याचा सल्ला देत आहेत.
के.एल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.
ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.