IND vs SA : अंतिम कसोटीत ऋषभ पंतने लावली आग, सोशल मिडियावर रोहित ते सचिनने घेतली उडी

India vs South Africa : ऋषभ पंतने अवघड परिस्थितीत त्याच्या नैसर्गिक खेळाचा अतुलनीय नमुना सादर करून नाबाद शतक झळकावले. या शतकासह पंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी शतक झळकावणारा पहिला विदेशी यष्टीरक्षक बनला आहे. त्याच्या खास खेळी आणि कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.

IND vs SA: Rishabh Pant's unbeaten century in final Test, Rohit to Sachin on social media
IND vs SA : अंतिम कसोटीत ऋषभ पंतने लावली आग, सोशल मिडियावर रोहित ते सचिनने घेतली उडी ।   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने शानदार नाबाद शतक
  • या शतकासह पंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी शतक झळकावणारा पहिला विदेशी यष्टीरक्षक बनला आहे.
  • त्याच्या खास खेळी आणि कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.

मुंबई : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) तिसऱ्या कसोटीच्या (Test) तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात शानदार शतक (century) झळकावले. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शैलीतील ही एक खास खेळी होती. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर पलटवार केला. भारताचे चार विकेट पडल्यानंतर पंत क्रीजवर आला. प्रथम, त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत (virat kohli) 94 धावांची भागीदारी केली, त्यामुळे भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. ऋषभ पंतच्या या शानदार खेळीबद्दल सोशल मीडियावर त्याच्यावर खूप कौतुकाचा वर्षाव होत आहे. (IND vs SA: Rishabh Pant's unbeaten century in final Test, Congratulations from Rohit to Sachin on social media)

कर्णधारासोबत पार्टनशीप

सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असतानाच भारताने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या विकेट्स गमावल्या. यानंतर पंत क्रीजवर आला आणि त्याला स्थिरावण्यास थोडा वेळ लागला. पण त्याने स्वत:च्या शैलीत शॉट खेळण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचे सलामीचे धमाके टाळण्यासाठी चांगले तंत्र आणि संयम राखला, जो प्रशंसनीय होता. त्यानंतर ऋषभ पंतने चेंडू सीमापार चालविण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्या टोकाला कोहलीने आरामात खेळ सुरू ठेवला. कोहली आऊट झाल्यानंतर भारतीय विकेट पडू लागल्या, पंतला माहित होते की त्याला आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा करायच्या आहेत.

टिकाकारांचे तोंड बंद केलं

त्याने तेच केले आणि कसोटी क्रिकेटमधील चौथे शतक पूर्ण करताना भारताची आघाडी २०० धावांच्या पुढे नेली. पंतने सहा चौकार आणि चार षटकार मारत तीनचा आकडा गाठला. जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात बाद होण्यासाठी घाईघाईने फटकेबाजी केल्याने ऋषभ पंतने या खेळीने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. क्रिकेटच्या दिग्गजांसह चाहतेही सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

आफ्रिकेला २१२ धावांचे लक्ष्य

तिसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने या तरुणाला साथ दिली होती. अखेरीस पंत 100 धावांवर नाबाद राहिला. भारताचा दुसरा डाव १९८ धावांत आटोपला. कसोटी आणि मालिका जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला २१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या शतकी खेळीत ऋषभ पंतनेही काही खास स्थाने गाठली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी