IND vs SA मुंबई : टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिकेसोबत (South Africa) 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया गुरुवारी मुंबईहून (Mumbai) रवाना झाली आहे. बीसीसीआयने (BCCI )संघाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (IND vs SA: Team India's take off for South Africa, Virat Kohli out of BCCI photos)
टीम इंडिया गुरुवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे. भारतीय संघाला २६ डिसेंबरपासून यजमानांसोबत ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने फ्लाइटमधील भारतीय खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. BCCI ने 4 फोटो शेअर केले आहेत, शेअर केलेल्या फोटोत जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव दिसत आहेत, पण BCCI च्या या फोटोंमध्ये विराट कोहली दिसत नाही.
विराटने टी20 वर्ल्ड कपनंतर छोट्या फॉर्मेट म्हणजे टी20 च्या सामन्यांमध्ये कर्णधार राहणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु टी20 विश्व कपमधील सामन्यांदरम्यान भारतीय संघाची कामगिरी खराब होत असल्याने कोहलीकडून एकदिवशीय सामन्यांतील कर्णधारपद देखील काढून घेण्यात आलं. अशा स्थितीत बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने सांगितले की, कसोटी संघाची घोषणा होण्याच्या सुमारे दीड तास आधी त्याला वन-डे कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कसोटी संघाच्या निवडीबाबत चर्चा केल्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला सांगितले की, तो यापुढे एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील, पण कर्णधारपदावरून हटवण्याबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. यावरुन विराट कोहली आणि बीसीसीआय यामधील वाद पेटला आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण ३९ कसोटी सामने खेळले गेले आहेत. या 39 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने 15 सामने जिंकले असून भारताने 14 सामने जिंकले आहेत, तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. या 39 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने 15 सामने जिंकले असून भारताने 14 सामने जिंकले आहेत, तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही आणि दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी कर्णधार कोहली म्हणाला की यावेळी काहीतरी विशेष करून तिथे जिंकता येईल