IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या शानदार विजयाने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा बदल; भारताची झाली घसरण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 15, 2022 | 11:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Test Championship | भारताला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात ७ बळींनी पराभवाचा सामना करावा लागला. केपटाउन कसोटीतील विजयासोबतच यजमान संघाने भारताविरूध्दच्या मालिकेवर २-१ ने कब्जा केला. लक्षणीय बाब म्हणजे या विजयाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायदा झाला तर भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे.

 ind vs sa test series South Africa stunning victory has made a big difference in the Test Championship
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने चॅम्पियनशिपमध्ये मोठा बदल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने चॅम्पियनशिपमध्ये मोठा बदल झाला.
  • भारतीय संघाने मालिकेतील शेवटचा सामना गमावल्यानंतर आता संघाची कसोटी चॅम्पियनशिपमध्ये घसरण झाली आहे.
  • भारताची आता पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

Test Championship | नवी दिल्ली : भारताला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या (India vs South Africa) तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात ७ बळींनी पराभवाचा सामना करावा लागला. केपटाउन कसोटीतील (Cape Town Test Match) विजयासोबतच यजमान संघाने भारताविरूध्दच्या मालिकेवर २-१ ने कब्जा केला. लक्षणीय बाब म्हणजे या विजयाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायदा झाला तर भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेविरूध्द मालिका जिकंण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले आहे. केपटाउन कसोटीच्या चौथ्या दिवशी विजयासाठी मिळालेल्या २१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग यजमान आफ्रिकन संघाने ३ गडी गमावून पूर्ण केला. यापूर्वी जोहान्सबर्गमध्ये देखील संघाने २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करून ७ बळीतच विजय मिळलवला होता. दरम्यान मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून विजयी सलामी देत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सलग दोन सामन्यात संघाला पराभव स्विकारावा लागला बदल्यात मालिका देखील गमवाववी लागली. (ind vs sa test series South Africa stunning victory has made a big difference in the Test Championship).  

चॅम्पियनशिपमध्ये बदल 

भारतीय संघाने मालिकेतील शेवटचा सामना गमावल्यानंतर आता संघाची कसोटी चॅम्पियनशिपमध्ये घसरण झाली आहे. भारत आता पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान यजमान आफ्रिकन संघाला विजयाचा फायदा मिळाला आहे आणि ते भारताहून वरच्या चौथ्या स्थानावर आहे. २ सामन्यातील दोन्ही सामन्यात विजय मिळवून १०० टक्के विजयाचा विक्रम करणाऱ्या श्रीलंकेचा संघ या यादीत अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया ३ विजयांसह ८३ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तान भारतापेक्षा वरचढ 

दरम्यान, पाकिस्तानने देखील ३ विजय मिळवले आहेत आणि त्यांच्या विजयाची क्षमता ७५ टक्के आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ६६ टक्के विजयी क्षमतेनुसार चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.तर ४९ टक्के विजयाच्या क्षमतेमुळे भारतीय संघाची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी