IND vs SA : भारतीय संघाने केला निराशाजनक विक्रम; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असे

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 14, 2022 | 13:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa Test series | भारतीय संघाने आफ्रिकन धरतीवर दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केपटाऊन येथील न्यूलँड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज पुन्हा एकदा संघर्ष करताना पाहायला मिळाले. पहिल्या डावात २२३ धावा करणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ १९८ धावांवर गारद झाला.

ind vs sa The Indian team has set a disappointing record during the third Test
भारतीय संघाने केला निराशाजनक विक्रम 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघाने आफ्रिकन धरतीवर दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
  • ऋषभ पंतने एकट्याने ११० धावांची शतकीय खेळी केली.
  • भारतीय फलंदाजी केवळ १९८ धावांत गारद झाल्याने त्यांनी एक निराशाजनक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

India vs South Africa Test series | केपटाउन : भारतीय संघाने आफ्रिकन धरतीवर दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केपटाऊन येथील न्यूलँड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज पुन्हा एकदा संघर्ष करताना पाहायला मिळाले. पहिल्या डावात २२३ धावा करणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ १९८ धावांवर गारद झाला. यातही यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) एकट्याने ११० धावांची शतकीय खेळी केली. त्याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारताचा दुसरा कोणताही फलंदाज टिकू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मार्क जेन्सनने (Marco Jansen) सर्वाधिक चार बळी घेतले तर कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि एनगिडीने (Lungi Ngidi) प्रत्येकी ३-३ बळी पटकावले. (ind vs sa The Indian team has set a disappointing record during the third Test). 

भारतीय फलंदाजी केवळ १९८ धावांत गारद झाल्याने त्यांनी एक निराशाजनक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या दोन्ही डावात सर्व फलंदाज झेलबाद झाले. क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे, जेव्हा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात एका संघाचे सर्व फलंदाज झेलबाद होऊन माघारी परतले. यापूर्वी पाच वेळा संघाचे १९ फलंदाज झेलबाद झाले होते.

Read Also : आज भाजपचे 3 मंत्री आणि 6 आमदार करणार सायकल'ची स्वारी

पाच वेळा झेल पकडून बाद झालेले १९ बळी 

१. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन             १९८२/८३
२. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी        २००९/१०
३. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डर्बन         २०१०/११
४. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन              २०१३/१४
५. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, केप टाउन  २०१९/२०

एका शतकी खेळीसह भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्या

१. १९८ वि. दक्षिण आफ्रिका, केपटाऊन        (२०२१-२२) - ऋषभ पंत (१००*)
२. २०८ वि. न्यूझीलंड, वेलिंग्टन                     (१९९८-९९) - मोहम्मद अझरुद्दीन (१०३*)
३. २१५ वि. दक्षिण आफ्रिका, पोर्ट एलिझाबेथ (१९९२-९३) - कपिल देव (१२९)
४. २१९ वि. इंग्लंड, एजबॅस्टन                   (१९९) - सचिन तेंडुलकर (१२२)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी