IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

India vs South Africa 1st T20I Preview: आज भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या T20 सामना आज होणार आहे. सायंकाळी 7 वाजता दोन्ही संघ यावेली भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी20 विश्वचषकापूर्वी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी सुधारण्याचा प्रयत्न करेल.

ind vs sa today india south africa clash in first t20 know important things related to match
भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी  |  फोटो सौजन्य: AP, File Image
थोडं पण कामाचं
  • भारत-दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची टी-२० मालिका
  • मालिकेतील पहिला सामना बुधवारी होणार आहे
  • तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर टक्कर होणार

IND vs SA T-20 Match: तिरुवनंतपुरम: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) तीन सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत असून, भारतीय संघ (Team India) टी-20 विश्वचषकापूर्वी आपल्या डेथ ओव्हर्सची गोलंदाजी सुधारण्याचा आणि फलंदाजांना चांगला सराव देण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Gole) म्हणाला की, डेथ ओव्हरमध्ये गोंलदाजी सुधारणा करण्याची गरज आहे. भारतीय संघाला त्यांचे दोन प्रमुख गोलंदाज, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांची उणीव भासेल, ज्यांना T20 विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. (ind vs sa today india south africa clash in first t20 know important things related to match)

मोहम्मद शमी खेळणार नाही

मोहम्मद शमी अद्याप कोरोना संसर्गातून बरा झालेला नाही आणि तो तिन्ही सामने खेळू शकणार नाही. हर्षल पटेल दुखापतीतून बरा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत परतला पण त्याने 12 च्या सरासरीने धावा दिल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट नऊच्या वर होता. विश्वचषकासाठी स्टँडबाय दीपक चहरला गेल्या मालिकेत संधी मिळाली नाही आणि आता वेगवान गोलंदाजांना रोटेशन पॉलिसी वापरल्यास तो तीन सामने खेळू शकतो. अर्शदीप सिंगकडून स्लॉग ओव्हर्समध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जो जसप्रीत बुमराहला साथ देईल.

अश्विनला संधी मिळेल का?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळपट्टी सपाट होती. पण तिसऱ्या सामन्यात युजवेंद्र चहलने टर्निंग पिचवर चांगली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या लक्षात घेऊन चहलची कामगिरी सुधारण्याचे लक्ष्य असेल. रोहित शर्माने विश्वचषकापूर्वी सर्व खेळाडूंना संधी देण्याबाबत सांगितले आहे, त्यामुळे आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये वगळले जाऊ शकते.

फलंदाजीत केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्ध फारशी चमक दाखवू शकला नाही आणि त्याला या मालिकेत त्याची भरपाई करावी लागेल.

कोहली आणि रोहित फॉर्मात

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या फॉर्मात असून राहुललाही वेगाने धावा काढाव्या लागतील. दिनेश कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी फक्त आठ चेंडू मिळाले आणि रोहितने आधीच सांगितले आहे की त्याला क्रीजवर अधिक वेळ घालवण्याची गरज आहे. विश्वचषकाच्या संघात समाविष्ट असलेला दीपक हुडा पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकणार नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला मैदानात उतरवले जाऊ शकते.

द. आफ्रिकेविरुद्ध विजय नाही.. 

मायदेशातील द्विपक्षीय मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलेले नाही. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येतील पण तेव्हा परिस्थिती वेगळी असेल. या तीन सामन्यांमध्ये दोन्ही संघ त्यांच्या कमकुवतपणा शोधून त्यावर काम करू शकतात. दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी म्हणाला, 'ऑस्ट्रेलियामध्ये खेळपट्ट्या वेगळ्या असतील आणि मैदाने मोठी असतील पण गोलंदाजाने नेहमी त्याच्या कामगिरीवर काम केले पाहिजे. भारतीय फलंदाजांना आजमावण्याची ही सुवर्णसंधी असेल.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी