IND vs SA World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, हे असू शकतात प्लेइंग 11

उद्या 30 ऑक्टोबरला हे दोन्ही संघ मैदानात उतरतील.  भारतीय वेळेनुसार, उद्या दुपारी 4 वाजता हा सामना होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमीफाइनलच्या दिशेने वाटचाल करायची आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये (Team India Playing 11) मोठे बदल करू शकतो.

Team India ready for the match against South Africa
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीही दोन्ही सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये होता.
  • टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमीफाइनलच्या दिशेने वाटचाल करायची आहे.
  • टीम इंडियाने नेदरलँड्सविरुद्धचा दुसरा सामना 56 धावांनी जिंकला होता.

IND vs SA World Cup 2022 : T-20 विश्वचषक स्पर्धेत (T-20 World Cup 2022 ) पिस्तान ( Team Pakistan) पाठोपाठ नेदरलँडचा (Team Nedarland) पराभव केल्यानंतर टीम इंडिया (Team India)पॉइंट्स टेबलवर टॉपवर पोहोचली. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी भिडणार आहे. उद्या 30 ऑक्टोबरला हे दोन्ही संघ मैदानात उतरतील.  भारतीय वेळेनुसार, उद्या दुपारी 4 वाजता हा सामना होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमीफाइनलच्या दिशेने वाटचाल करायची आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये (Team India Playing 11) मोठे बदल करू शकतो. (IND vs SA World Cup 2022 : Team India ready for the match against South Africa, this could be the playing 11)

अधिक वाचा : नोव्हेंबर महिना 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ, होतील भाग्यवान

टीम इंडियाने T20विश्वचषक स्पर्धेची दमदार सुरुवात करत पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना 4 गडी राखून जिंकला. त्यानंतर टीम इंडियाने नेदरलँड्सविरुद्धचा दुसरा सामना 56 धावांनी जिंकला. आता दक्षिण आफ्रिकेशी महामुकाबला होणार असून या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागलं आहे. हा सामना जर जिंकला तर टीम इंडिया सेमिफायनलमध्ये पोहचेल. हा सामना जिंकण्यासाठी रोहित शर्माला आपली टीम मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष देऊन त्यांची निवड करावी लागणार आहे. दरम्यान, टी-20 वर्ल्ड कपमध्ये केएल राहुल फ्लॉप ठरला आहे. पण तो मोठ्या सामन्यांचा खेळाडू मानला जात असून तो  या सामन्यात तो कॅप्टन रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसू शकतो.

अधिक वाचा : गोल्डन बॉय नीरज चोप्रा मिळालं हॉलीवूडचं तिकिटं

रोहित शर्माने नेदरलँड्सविरुद्ध मागच्या सामन्यात 53 धावांची शानदार खेळी केली होती. रोहित-राहुल विकेट्सच्या दरम्यान उत्कृष्ट धावा करतात.तर मधल्या फळीची कमान खांद्यावर घेणारा विराट कोहलीही दोन्ही सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये होता.  टी –20 वर्ल्ड कपमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची खेळी खेळली होती. त्याचवेळी त्याने नेदरलँड्सविरुद्ध 62 धावा केल्या होत्या. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग- 11 मध्ये सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळू शकते. त्याने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक केले. स्टार हार्दिक पंड्याला प्लेइंग-11 मध्ये पाचव्या क्रमांकावर स्थान मिळू शकते. हार्दिक बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये निष्णात खेळाडू आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक विकेटकीपरची जबाबदारी सांभाळताना दिसेल.

तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार वेगवान बॉलिंगचे नेतृत्व करताना दिसेल . त्याला साथ देण्यासाठी अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळू शकते. फिरकीपटू विभागाची जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपवली जाऊ शकते. तर रविचंद्रन अश्विनच्या जागी युझवेंद्र चहलला प्लेइंग- 11मध्ये संधी मिळू शकते. तो आतापर्यंत 2022 च्या T-20 विश्वचषकात एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे या सामन्यात त्यांची एन्ट्री होऊ शकते.

अधिक वाचा :टेक-ऑफ करणाऱ्या विमानाच्या इंजिनला लागली आग

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची संभाव्य टीम प्लेइंग 11-

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल.

लाईव्ह सामना अन् लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर  पाहता येईल. तर तुम्ही हॉटस्टारवर (Hotstar), T20 विश्वचषक सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता.

 विनामूल्य कुठे बघता येईल?

 T20 विश्वचषक सामना देखील DD Sports वर लाइव्ह असेल. आपण हा सामना येथे फ्री बघू शकतात.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी