IND vs SL 1st T-20 match schedule Live streaming score card updates: श्रीलंका क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर असून मंगळवार (3 जानेवारी 2023) पासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 सीरिज सुरू होत आहे. एकूण तीन मॅचेसची ही सीरिज होणार आहे. यापैकी पहिली मॅच मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व ऑलराऊंडर हार्दिक पांड्या करणारर आहे. जाणून घ्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-20 मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येईल. (IND vs SL 1st t20 match live streaming telecast channel india vs sri lanka score card updates in marathi)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 इंटरनॅशनल सीरिजमधील पहिली मॅच मंगळवारी (3 जानेवारी 2023) खेळण्यात येणार आहे.
हे पण वाचा : मृत्यूपूर्वी मिळतात हे 5 संकेत
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिली टी-20 मॅच मंगळवारी मुंबईत खेळण्यात येणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ही मॅच आयोजित करण्यात आली आहे.
#TeamIndia squad for three-match T20I series against Sri Lanka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/iXNqsMkL0Q — BCCI (@BCCI) December 27, 2022
भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळण्यात येणाऱ्या पहिल्या टी-20 मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही संध्याकाळी 7 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर लाईव्ह पाहू शकता. यासोबतच मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग disney + hotstar App वर पाहू शकता. तसेच डीडी स्पोर्ट्सवर सुद्धा मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता.
हे पण वाचा : Happy New Year 2023: नववर्षात व्हाल मालामाल, केवळ करावे लागेल हे काम
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली टी-20 मॅच संध्याकाळी 7 वाजता खेळली जाणार आहे. मॅच सुरू होण्याच्या अर्धा तास आधी टॉस होणार आहे.
हे पण वाचा : स्वप्नात चंद्र दर्शन होणे शुभ की अशुभ? वाचा
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील पीच बॅट्समन आणि बॉलर्स दोघांसाठी फायद्याची ठरते. यावेळीही पीचवर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये बॅट्समनचा बोलबाला पहायला मिळू शकतो. तर मध्यल्या ओव्हर्समध्ये स्पिनर्स आणि त्यानंतर फास्ट बॉलर्स आपलं वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. हवामानाचं बोलायचं झालं तर मंगळवारी मुंबईतील वातावरण चांगलं असेल. पावसाच्या व्यत्ययाचा प्रश्नच उद्भवत नाही. येथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.