IND vs SL, 2nd ODI : टीम इंडिया सीरिज जिंकणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन अन् ईडन गार्डनवरील विजयाचा इतिहास

IND vs SL, 2nd ODI : Playing eleven Team : हा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकासाठी ‘करो या मरो’चा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच झुंज पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Team India will win the series? Know the playing eleven
टीम इंडिया सीरिज जिंकणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • श्रीलंका संघाला या मैदानावर सर्वात्तम कामगिरी करावी लागणार आहे.
  • दोन्ही संघात आतापर्यंत 163 सामने खेळवण्यात आले आहेत.
  • ईडन गार्डन मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना 30 पैकी 18 सामन्यांत विजय मिळवता आला आहे.

IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (india vs sri lanka) यांच्यात आज  गुरुवारी कोलकात्याच्या   (Kolkata) ईडन गार्डन ( Eden Garden) मैदानावर दुसरा वनडे (ODI)सामना (match) रंगणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकासाठी ‘करो या मरो’चा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच झुंज पहायला मिळण्याची शक्यता आहे. (IND vs SL, 2nd ODI : Know the history of victory at Eden Garden; hpw is the playing XI )

अधिक वाचा  : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते सुपर कम्युनिस्ट

 भारताने विजयी सलामी देत जिंकून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0आघाडी घेतली आहे. मालिका बरोबरी करण्यासाठी श्रीलंकेला दमदार खेळ दाखवावा लागेल. जर सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला तर  श्रीलंका टीमवर दौऱ्यात सलग दुसरी मालिका गमावण्याची नामुष्की ओढवणार आहे. त्यामुळे आता श्रीलंका संघाला या मैदानावर सर्वात्तम कामगिरी करावी लागणार आहे.  

असे आहेत आकडे 

दोन्ही संघात आतापर्यंत 163 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया श्रीलंकावर वरचढ आहे. टीम इंडियाने 163 पैकी 94 सामन्यात श्रीलंकावर विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने टीम इंडियाचा 57 मॅचमध्ये पराभव केलाय. 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

अधिक वाचा  : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मराठी भाषण

असा आहे  ईडन गार्डनचा इतिहास

कोलकताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. यातून आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना 30 पैकी 18 सामन्यांत विजयाची नोंद करता आली.  तर आव्हानांचा पाठलाग करताना  संघांना 11 वेळा विजय मिळवता आला आहे. 

अधिक वाचा  : उर्फीच्या च्या मदतीला अमृता फडणवीस आल्या धावून

श्रीलंकेसमोर हिटमॅन रोहितचे आव्हान

श्रीलंकेसमोर याच मैदानावर द्विशतकवीर रोहित शर्माला रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कारण टीम इंडियाच्या कर्णधार रोहितने याच मैदानावर 2014 मध्ये 264 धावांची खेळी केली होती. त्याने 33 चौकार आणि 9 षटकार मारले होते.  त्यामुळे भारताला या मैदानावर सामन्यात 133 धावांनी श्रीलंकेला धूळ चारता आली होती. तसेच या मैदानावर रोहितच्या नावे 136 च्या सरासरीने धावा काढण्याची विक्रमी कामगिरी आहे. 

कशी असणार प्लेइंग इलेव्हन?

पहिल्या सामन्यात शुबमन गिलसाठी द्विशतकवीर इशान किशनला बाहेर बसवण्यात आले होते. तर सूर्यकुमार यादवऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. या निर्णयामुळे टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मावर सडकून टीका करण्यात आली होती. आता दुसऱ्या सामन्यात रोहित आहे तीच प्लेइंग इलेव्हन कायम ठेवणार की इशान आणि सूर्यकुमारला संधी देणार, हे ही पाहणं तितकंच महत्त्वाचं  ठरेल. 

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया :

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

श्रीलंका :

दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी