Hardik fires at bowlers पुणे: दुसऱ्या टी20 सामन्यात (T20 match)भारतीय संघाचं पानीपत झालं. भारत-श्रीलंकेविरुद्धातील टी 20 मालिकेतील दुसरा सामना श्रीलंकेने (Sri Lanka) 16 धावांनी जिंकला. आता 3 टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये श्रीलंकेने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. नाणेफेकपासून भारतीय संघाचे (Indian team) निर्णय चुकीचे ठरले.नाणेफेक जिंकून कर्णधार (Captain)हार्दिक पंड्याने ( (Hardik Pandya) प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय पूर्णतः चुकीचा ठरला. भारतीय गोलंदाजांची लंकेच्या फलंदाजांनी जोरादार धुलाई केली. श्रीलंकेने 20 षटकात 6 विकेट गमावून 206 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने गोलंदाजांवर आगपाखड केली. (Captain Hardik fires at bowlers as India loses;Said this is the biggest offense in T20)
या सर्वांमध्ये अग्रस्थानी होता दोन षटकात 5 नो बॉल फेकणारा अर्शदीप सिंग. कर्णधार हार्दिक पंड्याने अर्शदीप सिंगची जोरदार क्लास घेतला. हार्दिकने नो बॉल हा क्राइम असल्याच सांगितलं. अर्शदीप सिंहसह भारतीय गोलंदाजांनी एकूण 7 नो बॉल टाकले. यात 5 नो बॉल एकट्या अर्शदीपने टाकले. तुमच्या चेंडूवर धावा होत नसल्या तरी चालतील परंतु आपली गोलंदाजी व्यवस्थीत केली पाहिजे. मी टी-20 मध्ये नो बॉल हा गुन्हा मानतो आणि अशी चूक असह्य असल्याचं हार्दिक म्हणाला.
उमरान मलिक आणि शिवम मावीने प्रत्येकी एक-एक नो बॉल टाकला. “पावरप्लेमध्ये आम्ही गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात खराब खेळ केला. आम्ही काही बेसिक चूका केल्या. ज्या करायला नको होत्या. तुमचा दिवस खराब असू शकतो. पण तुम्ही बेसिक्सपासून भरकटू शकत नाही.अर्शदीपने आधी सुद्धा नो बॉल टाकला होता. इथे कोणाला दोष द्यायचा नाहीये. पण नो बॉल एक क्राइम आहे” असं हार्दिक पंड्या म्हणाला.
हार्दिकने गोलंदाजी आणि फलंदाजीमधील पॉवरप्लेचा फायदा न घेणे हे पराभवाचे प्रमुख कारण असल्याचे नमूद केले. तो म्हणाला, गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही पॉवरप्लेमध्ये आमची कामगिरी खराब होती आणि त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. आम्ही काही मूलभूत चुका केल्या ज्या या टप्प्यावर व्हायला नको होत्या. कोणी काय केले हे सर्वांना माहीत आहे. सूर्यकुमार, अक्षर आणि शिवम मावी यांनी ज्या प्रकारे अखेरच्या फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले ते पाहून आनंद झाला. यासोबतच आम्हाला एक चांगला धडा मिळाला आहे, की ज्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता त्याकडे लक्ष दिले पाहिजे.
हार्दिकने पुढे बोलताना म्हणाला की, जर कोणता दिवस तुमचा चांगला असतो तर कधी तो वाईट असू शकतो. परंतु आपल्या मुलभूत गोष्टींकडे आपण दूर्लक्ष करू शकत नाहीत.आम्ही मुलभूत गोष्टींकडे लक्ष देऊ.आपल्या चेंडूवर धाव निघत असतील त्यात काही गैर नाही पण आपल्या मुलभूत गोष्टी विसरता कामा नये.अर्शदीप सिंगवर रागवत कर्णधार हार्दिक म्हणाला की, एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून असताना आपल्या समोर मोठी समस्या निर्माण होत असते. तुमचं प्रदर्शन चांगले राहिले आहे, यावरुन सर्वच गोष्टी मान्य केल्या जात नाहीत. आतापर्यंत तुमची कामगिरी चांगली राहिली परंतु याआधीही तुम्ही नो बॉल टाकले आहेत. आता कोणाला दोष देत नाहीये परंतु हे क्रिकेट आहे. तुमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असाल किंवा टी 20 क्रिकेट यात फॉर्मेटमध्ये नो बॉल टाकणं एक गुन्हा असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे.
दुसऱ्या टी 20 सामन्यात अर्शदीप सिंहने फक्त 2 ओव्हर टाकल्या. त्याने 18.50 च्या इकोनॉमीने 37 धावा दिल्या. T20 इंटरनॅशनल मॅचमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा लज्जास्पद रेकॉर्डची अर्शदीपच्या नावावर नोंद झालीय. श्रीलंकेने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 6 विकेट गमावून 206 धावा केल्या. कुसल मेंडिसने 52 आणि दासुन शनाकाने नाबाद 56 धावा केल्या.