IND vs USA: भारतीय महिला हॉकी संघाचा सलग दुसरा विजय; FIH Pro League मध्ये अमेरिकेचा केला दारूण पराभव

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 23, 2022 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs USA, FIH Pro League । भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी दुस-या एकतर्फी लढतीत युनायटेड स्टेट्सचा ४-० अशा मोठ्या फरकाने पराभव करून एफआयएच प्रो लीगच्या पदार्पणाच्या हंगामात तिसरे स्थान पटकावले आहे.

IND vs USA The Indian women's team defeated the United States in the FIH Pro League
भारतीय महिला हॉकी संघाने अमेरिकेचा केला दारूण पराभव   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय महिला हॉकी संघाचा सलग दुसरा विजय.
  • FIH Pro League मध्ये अमेरिकेचा केला दारूण पराभव.
  • मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेचा ४-२ असा पराभव केला होता.

IND vs USA, FIH Pro League । नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाने बुधवारी दुसऱ्या एकतर्फी लढतीत युनायटेड स्टेट्सचा ४-० अशा मोठ्या फरकाने पराभव करून एफआयएच प्रो लीगच्या (FIH Pro League) पदार्पणाच्या हंगामात तिसरे स्थान पटकावले आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेचा ४-२ असा पराभव केला होता. (IND vs USA The Indian women's team defeated the United States in the FIH Pro League). 

अधिक वाचा : शिवसेना आमदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

भारताचा सलग दुसरा विजय

भारताकडून वंदना कटारिया (३९व्या आणि ५४व्या मिनिटाला) दोन तर सोनिका (५४व्या मिनिटाला) आणि संगीता कुमारी (५८व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला. लक्षणीय बाब म्हणजे अर्जेंटिनाच्या संघाने याआधीच विजेतेपद पटकावले आहे, तर नेदरलँडच्या संघाने दुसरे स्थान पटकावले आहे.

पहिल्या हाफ टाईमपर्यंत बरोबरीचा खेळ

अमेरिकेने सामन्याच्या सुरूवातीच्या दुसऱ्याच मिनिटाला पहिली संधी निर्माण केली पण एलिझाबेथ येगरचा दमदार शॉट भारतीय कर्णधार आणि गोलरक्षक सविताने हाणून पाडला. त्यानंतर शर्मिला देवीने गोल करण्याची सुवर्णसंधी गमावली कारण ती अमेररिकन गोलकिपरला खूप जवळून हुलकावणी देण्यात अपयशी झाली. सलीमा टेटेने उजव्या बाजून अनेक संधी निर्माण केल्या मात्र पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये २३ व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो देखील वाया. त्यानंतर भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्यातही संघाला गोल करता आला नाही, त्यामुळे हाफ टाईमपर्यंत स्कोअर ०-० असा बरोबरीत राहिला.

लक्षणीय बाब म्हणजे हाफ टाईमनंतर पेनल्टी कॉर्नरवर नवनीत कौरने मारलेला फटका अमेरिकेची गोलरक्षक केल्सी बिंगने रोखला. भारताने ३९ व्या मिनिटात आघाडी घेतली जेव्हा पाचव्या पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौरच्या फ्लिकचे रूपांतर वंदनाने गोलमध्ये केले. त्यानंतर नवनीतने अतिशय सोपी संधी गमावली.

भारताची सांघिक खेळी

भारताने अवघ्या चार मिनिटांत तीन गोल नोंदवून सामना जिंकला. प्रथम वंदनाने उजव्या टोकाकडून गोल केला आणि त्यानंतर काही सेकंदांनी सोनियाने गोल केला. सविताने ५७व्या मिनिटाला मैदानी गोल करून स्कोअर ४-० असा केला. १ ते १७ जुलै दरम्यान नेदरलँड आणि स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या महिला विश्वचषकापूर्वी या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास वाढणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी