नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India and West Indies) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 (T20) मालिकेतील (series) तिसरा सामना (match) वॉर्नर पार्क (Warner Park), सेंट किट्स (St. Kitts) येथे खेळला गेला. या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने (Team India) 7 गडी राखून विजय दणदणीत मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार (Captain) रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी (Bowling) करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात मेयर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. या आव्हानाच्या प्रत्युत्तरात भारताने 19 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात विजय संपादीत केला आहे.
या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव हा चमकला असून त्याने जोरदार फलंदाजी करत सर्वाधिक 76 धावा केल्या. त्याखालोखाल ऋषभ पंतने 26 चेंडूत 33 धावांची धडाकेबाज खेळी केली. या विजयासह भारताने पाकिस्तानच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने 15 वेळा जिंकले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानच्या संघाने 21 टी-20 सामन्यांमध्ये 15 सामने जिंकले आहेत.
Read Also : Salman : बुलेट प्रूफ गाडीमधून एअरपोर्टवर पोहोचला सलमान खान
कर्णधार रोहित शर्मा 5 चेंडूत 11 धावा करून निवृत्त झाला. त्याचवेळी श्रेयस अय्यर 27 चेंडूत 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमारसाठी आपला फॉर्म वापस आणण्याची ही संधी चालून आली आणि त्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी शेवटच्या 5 षटकात 56 धावा केल्या. सर्वाधिक 73 धावा काइल मेयर्सने केल्या. त्याचवेळी रोव्हमन पॉवेलने 23 धावांची खेळी साकारली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 2 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने 1-1 विकेट घेतली.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होता आणि त्याने 5 चेंडूत 1 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 11 धावा केल्या आणि रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूत अकील हुसेनच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताची पहिली विकेट श्रेयस अय्यरच्या रूपाने पडली आणि त्याने 24 धावांची खेळी खेळली. सूर्यकुमार यादवने 44 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 76 धावांची शानदार खेळी खेळली आणि तो झेलबाद झाला.
Read Also : उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला
हार्दिक पांड्या 4 धावा करून झेलबाद झाला. यानंतर ऋषभ पंतने 26 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 33 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. दीपक हुड्डाही 7 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने नाबाद 10 धावा करून नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने या सामन्यात 76 धावा करत आपला फॉर्म परत मिळवला आणि ही त्याची वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी ठरली.
किंगने मेयर्सच्या साथीने पहिल्या विकेटसाठी सुरेख भागीदारी करत संघासाठी 57 धावा केल्या, मात्र हार्दिक पांड्याने किंगला 20 धावांवर बाद करून भारताला पहिली यश मिळवून दिले. काइल मेयर्सने 36 चेंडूत षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे अर्धशतक ठरले. कर्णधार निकोलस पूरनने 22 धावांची खेळी केली आणि ऋषभ पंतने भुवीच्या चेंडूवर झेल घेत त्याचा डाव संपवला. मेयर्सने चांगली खेळी खेळली आणि 50 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 73 धावा केल्या परंतु भुवीच्या चेंडूवर पंतने त्याला झेलबाद केले.
Read Also : लॉन बॉलमध्ये भारतीय महिलांना मिळाले गोल्ड
अर्शदीप सिंगने पॉवेलला 23 धावांवर बाद केले. दीपक हुड्डाने पॉवेलचा झेल पकडला. हेटमायर 20 धावा करून धावबाद झाला. भारताकडून भुवीला दोन तर अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळाले. परंतु भारताचा नवा गोलंदाज आवेश खानची वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी जोरदार कुटाई केली. आवेशने तीन षटकात 15.70 च्या इकॉनॉमी रेटने 47 धावा दिल्या.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला. या सामन्यासाठी रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी दीपक हुडाचा अंतिम अकरामध्ये समावेश करण्यात आला. वेस्ट इंडिजनेही एक बदल केला आणि ओडियन स्मिथच्या जागी डॉमिनिक ड्रेकचा संघात समावेश करण्यात आला.
आतापर्यंत या मैदानावर 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी सात संघ प्रथम गोलंदाजी करून जिंकले आहेत. केवळ दोन सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. पहिल्या डावात येथील सरासरी धावसंख्या 128 आहे. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या इंग्लंडची (182/6) आहे. वेस्ट इंडिजची येथे सर्वात कमी धावसंख्या 45 धावा आहे.