IND vs ZIM: गोलंदाजांची कमाल, टीम इंडियासमोर सोपे आव्हान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 18, 2022 | 16:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Zimbabwe: भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वे संघाची दाणादाण उडवली असून टीम इंडियासमोर विजयासाठी १९० धावांचे सोपे आव्हान आहे.

india vs zimbabwe
IND vs ZIM: गोलंदाजांची कमाल, टीम इंडियासमोर सोपे आव्हान 
थोडं पण कामाचं
  • भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात जबरदस्त मारा करत झिम्बाब्वेच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.
  • झिम्बाब्वेची पहिली फळी सपशेल अपयशी ठरली.
  • सुरूवातीचे चार फलंदाज तर दुहेरी धावसंख्याही करू शकले नाहीत. 

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर १९० धावांचे माफक लक्ष्य ठेवले आहे. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात जबरदस्त मारा करत झिम्बाब्वेच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही. झिम्बाब्वेची पहिली फळी सपशेल अपयशी ठरली. सुरूवातीचे चार फलंदाज तर दुहेरी धावसंख्याही करू शकले नाहीत. 

अधिक वाचा - हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या बोटीचं ओमान कनेक्शन?

झिम्बाब्वेचा कर्णधार रेगिस चाकाबोवाने ३५ धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. झिम्बाब्वेचा ब्रॅड इव्हान्स ३३ धावांवर नाबाद राहिला. तर रिचर्ड नागवाराने ३४ धावा केल्या. 

भारताच्या गोलंदाजांनी यावेळी जबरदस्त कामगिरी केली. दीपक चहर, प्रसिद्ध कृ्ष्णा तसेच अक्षर पटेलने धमाकेदार कामगिरी करताना प्रत्येकी ३ बळी मिळवले. मोहम्मद सिराजने एक विकेट मिळवला. कुलदीप यादवने सर्वाधिक ओव्हर टाकल्या मात्र त्याला एकही बळी मिळवता आला नाही. भारताने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला गोलंदाजांनी जबरदस्त न्याय दिला. 

अधिक वाचा - बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे महिलेने कापले गुप्तांग

या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली यांना आराम देण्यात आला आहे. या सामन्यात केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे तर शिखर धवन उपकर्णधार आहे. याआधी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात प्रतिस्पर्धी संघाना नमवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. 

झिम्बाब्वेने ३१ धावांवर गमावल्या होत्या ४ विकेट तर ११०वर ८

झिम्बाब्वेने भारतासमोर विजयासाठी १९०धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या झिम्बाब्वेची सुरूवात खराब झाली होती. ३१ धावसंख्येवर झिम्बाब्वेने ४ विकेट गमावल्या होत्या. एकीके कर्णधार चकाबवाने एक बाजू सांभाळली होती मात्र दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. ११० धावसंख्येपर्यंत पोहोचेपर्यंत झिम्बाब्वेने ८ विकेट गमावल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी