IND vs ZIM 2nd ODI Pitch-Weather Report: भारत वि. झिम्बाब्वे दुसरी वन डे आज होणार, जाणून घ्या पिच आणि वेदर रिपोर्ट

IND vs ZIM 2nd ODI Harare Sports Club Pitch Report Harare Weather Today : आज (शनिवार २० ऑगस्ट २०२२) भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरी वन डे मॅच हरारे येथे होणार आहे.

IND vs ZIM 2nd ODI Harare Sports Club Pitch Report Harare Weather Today
भारत वि. झिम्बाब्वे दुसरी वन डे आज होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारत वि. झिम्बाब्वे दुसरी वन डे आज होणार
  • जाणून घ्या पिच आणि वेदर रिपोर्ट
  • कोण खेळेल?

IND vs ZIM 2nd ODI Harare Sports Club Pitch Report Harare Weather Today : आज (शनिवार २० ऑगस्ट २०२२) भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरी वन डे मॅच हरारे येथे होणार आहे. दुसऱ्या वन डे मॅचसाठी टीम थोड्याच वेळात जाहीर होतील. पहिली वन डे मॅच जिंकल्यामुळे तीन मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-० असा आघाडीवर आहे. आजची मॅच जिंकल्यास भारत सीरिज जिंकेल. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे वन डे सुरू होणार आहे. भारताचे नेतृत्व केएल राहुल तर झिम्बाब्वेचे नेतृत्व विकेटकीपर फलंदाज असलेला रेजिस चकाब्वा करणार आहे. । क्रीडा / क्रिकेटकिडा

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही वन डे मॅच हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे आहेत. भारताने झिम्बाब्वे विरुद्धची पहिली वन डे मॅच दहा विकेट राखून जिंकली. या मॅचमध्ये झिम्बाब्वेने ४०.३ ओव्हरमध्ये सर्वबाद १८९ तर भारताने ३०.५ ओव्हरमध्ये बिनबाद १९२ धावा केल्या. या मॅचमध्ये ७ ओव्हरमध्ये २७ धावा देत ३ विकेट घेणारा दीपक चहर मॅन ऑफ द मॅच झाला. भारताकडून शिखर धवनने नाबाद ८१ आणि शुभमन गिलने नाबाद ८२ धावांचे योगदान दिले.

हरारेची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. टॉस जिंकणारी टीम जास्त धावा करून दबाव टाकू इच्छीत असल्यास फलंदाजीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. पण धावांचा पाठलाग करणे सोपे आणि शक्य आहे असे वाटल्यास टॉस जिंकणारी टीम गोलंदाजीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.

व्यवस्थित फलंदाजी केल्यास दुसऱ्या वन डेमध्ये २८० ते ३०० दरम्यान धावा करणे शक्य असल्याचा अंदाज आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे येथे झालेल्या १७ पैकी १५ मॅच भारताने जिंकल्या आहेत तर २ मॅच झिम्बाब्वेने जिंकल्या आहेत. 

दुसऱ्या वन डे मॅचच्या वेळी पावसाची शक्यता नाही. आकाश निरभ्र राहील. मॅचच्या सुरुवातीचे काही तास मैदानावर उन पडण्याची शक्यता आहे. तापमान १९ ते २७ अंश से. दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग ताशी ८ ते १० किमी राहील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी