IND vs Zimbabwe T20 world cup match: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेली टी-20 मॅच टीम इंडियाने अगदी सहजच जिंकली. टीम इंडियाने (Team India) दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या टीमची सुरुवातच खराब झाली. झिम्बाब्वेचा ओपनर बॅट्समन पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यानंतर झिम्बाब्वेचे बॅट्समन एक-एक करुन माघारी परतले आणि टीम इंडियाने ही मॅच
71 रन्सने जिंकली. (IND vs ZIM t20 world cup 2022 match team India beat zimbabwe check scorecard in marathi)
मॅचच्या सुरुवातीला टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्रथम बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 186 रन्स केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक म्हणजेच 61 रन्स केल्या. सूर्यकुमार यादवने 25 बॉल्समध्ये नॉटआऊट राहत 61 रन्स केल्या. के. एल. राहुलने 51 रन्स केल्या. रोहित शर्माने 15 रन्स, हार्दिक पांड्याने 18 बॉल्समध्ये नॉटआऊट राहत 18 रन्स केल्या.
IND vs ZIM मॅचचा संपूर्ण स्कोअरकार्ड पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
झिम्बाब्वेकडून विलियम्सने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. विलियम्सने 2 ओव्हर्समध्ये 9 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर रिचर्ड, ब्लेसिंग मुझाराबनी आणि सिकंदर रझा या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या टीमची सुरुवातच निराशाजनक झाली. झिम्बाब्वेच्या टीमकडून रयान बर्ल याने सर्वाधिक म्हणजेच 35 रन्सची इनिंग खेळली. तर सिकंदर रझा याने 34 रन्सची इनिंग खेळली. टीम इंडियाकडून आर. अश्विन याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. आर. अश्चिन याने 4 ओव्हर्समध्ये 22 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शामी या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शामी याने दोन ओव्हर्समध्ये 14 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने 3 ओव्हर्समध्ये 16 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.