IND W vs AUS W T20 World Cup Semi-Final: आज होणार भारत-ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरी सामना, कशी आहे दोन्ही संघाची स्थिती

आज गुरुवारी उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia)लढणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला (Indian team) जबरदस्त कामगिरी करावी लागेल. भारतीय महिला क्रिकेट संघ हा मागील पाच वर्षातील टॉप संघापैकी एक आहे. परंतु  भारतीय महिला संघाने अद्याप कोणतीच मोठी ट्रॉफी मिळवलेली नाही.

IND W vs AUS W T20 World Cup Semi-Final
IND W vs AUS :आज होणार भारत-ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरी सामना  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघाला जबरदस्त कामगिरी करावी लागेल.
  • भारतीय महिला क्रिकेट संघ हा मागील पाच वर्षातील टॉप संघापैकी एक आहे.
  • हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात संघाने ग्रुपच्या सामन्यात चारपैकी तीन सामने जिंकले आहेत.

IND vs AUS Women's T20 World Cup Semi-Final Preview: महिला टी- 20 विश्वचषकात  (Women's T20 World Cup)भारतीय संघ (Indian team) चढउतार करत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आज गुरुवारी उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia)लढणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला (Indian team) जबरदस्त कामगिरी करावी लागेल. भारतीय महिला क्रिकेट संघ हा मागील पाच वर्षातील टॉप संघापैकी एक आहे. परंतु भारतीय महिला संघाने अद्याप कोणतीच मोठी ट्रॉफी मिळवलेली नाही. दरम्यान आपल्या अपेक्षेप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women's cricket team) आयसीसी टुर्नामेंटमधील (ICC Tournament) अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे.   (IND W vs AUS W T20 World Cup Semi-Final: India-Australia semi-final match will be held today )

अधिक वाचा  : काय आरजे रेडिओ जॉकी बनायचंय, पण कसं

मात्र, भारतीय संघाने यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशेषत: बाद फेरीत चांगली कामगिरी केलेली नाही. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. तर अलीकडेच गेल्या वर्षी बर्मिंगहॅममध्ये झालेल्या सुवर्णपदक सामन्यातही विजय मिळवला होता. वर्ष 2017 मध्ये एकदिवशीय विश्वकप फायनलमध्ये आल्यानंतर भारतात महिला क्रिकेट संघ वेगाने प्रगती करत आहे. दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाला करो या मरो प्रमाणे दमदार कामगिरी करावी लागेल. 

अधिक वाचा  : मुंबईत जोडीनं फिरायचं आहे मग या ठिकाणी जा

दरम्यान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात संघाने ग्रुपच्या सामन्यात चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. परंतु या सामन्यांमध्ये भारतीय संघाने म्हणावी तशी दमदार कामगिरी केलेली नाही. साध्या आर्यलंड सोबत झालेल्या सामन्यातदेखील भारताला चांगला खेळ करता आला नाही. भारतीय संघाला एकमेव इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ज्याप्रकारे खेळ केला आहे ते पाहता, एखाद्या मोठ्या सामन्यापूर्वी संघ कसा तरी त्यांच्या सर्व समस्या सोडवेल,अशी अशा आहे. संघातील टॉप ऑर्डरमधील विसंगती आणि ऋचा घोषला सोडता संघातील इतर खेळाडू षटकार लागावू शकत नाहीत. तसेच  संघाला 'डॉट' बॉलची टक्केवारीही कमी करावी लागणार आहे.
 अधिक वाचा  :  HSC : बोर्डाचा घोळ सुरूच; हिंदी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत गडबड

सलामी फलंदाजी शेफाली वर्माने तीन वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. तिला हवा तसा अनुभव नाहीये, आपल्या चुकांमधून शिकण्यास ती असमर्थ आहे. यात स्ट्राइक रोटेट करणं तसेच शॉर्ट बॉलवर खेळणं तिला कठिण जात आहे.  तर कर्णधार हरमनप्रीत कौरही दबावमध्ये आहे. तिला या विश्वचषकात दमदार कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजाना जोरदार फटके मारू शकणाऱ्या खेळाडूमध्ये हरमनप्रीतचा समावेश होतो, परंतु गेल्या काही सामन्यात तिला दमदार फटकेबाजी करता आली नाहीये. 

अधिक वाचा  : काय आहेत अग्निवीर भरती प्रक्रियेतील बदल, जाणून घ्या

विश्वचषकातील बाद फेरीतील पराभवामुळे तिचे कर्णधारपद जाऊ शकते. जेमिमा रॉड्रिग्सने आतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, परंतु तिच्याकडून संघाला अधिकच्या अपेक्षा आहेत. स्टार फलंदाज स्मृती मंधाना सातत्यपूर्ण फलंदाजी करत असून पुन्हा एकदा ती ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघासाठी महत्त्वाची असेल.

अधिक वाचा  : मार्च महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी

दुसरीकडे, मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ टी-20 सामन्यांमध्ये सलग 22 सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि मोठ्या सामन्यांमध्ये आपला खेळ अव्वल स्तरावर नेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ प्रसिद्ध आहे. मार्च 2021 मध्ये न्यूझीलंडकडून T20 सामन्यात पराभव मिळाल्यानंतर  ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कामगिरी केली आहे.त्यानंतर झालेल्या कोणत्याही स्वरूपातील सामन्यात ऑस्ट्रेलिया फक्त दोनदा पराभूत झाली आहे. हे दोन्ही पराभव भारताविरुद्ध झाले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने डिसेंबरमध्ये मुंबईत 4-1 ने मालिका जिंकली होती. ऑस्ट्रेलियन संघाने डिसेंबरमध्ये मुंबईत 4-1 ने मालिका जिंकली होती.

गोलंदाजीत, वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर ही आतापर्यंतच्या स्पर्धेतील भारताची सर्वोत्तम गोलंदाज ठरली आहे. या स्पर्धेत यशस्वी ठरली आहे. तिने आतापर्यंत 7 विकेट्स मिळवल्या आहेत.  इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिने 15 धावा देत पाच गडी बाद केले होते.  दीप्ती शर्माने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात तिने एका षटकात अनेक धावा दिल्या पण फिरकी विभागातील ती सर्वात सातत्यपूर्ण गोलंदाज आहे. पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादव यांना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध अधिक अचूक गोलंदाजी करावी लागेल. मागील निकालानंतरही ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनी भारतीय आव्हानासाठी सज्ज आहे. "मला खडतर सामन्याची अपेक्षा आहे, गेल्या काही वर्षांत भारताचा संघ खूप वेगाने सुधारत आहे आणि त्यांच्या संघात काही मॅचविनर आहेत," असे मुनीने मंगळवारी पत्रकारांना सांगितले. 

 खालीलप्रमाणे आहेत संघ 

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी पानवडे आणि राजेश्वरी गायकवाड. 

ऑस्ट्रेलिया: मेग लॅनिंग (सी), अ‍ॅलिसा हीली, डी'आर्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी