Ind W vs Aus W: एक नंबर! टी-20च्या Super overमध्ये ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, भारतीय महिला संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड; जाणून घ्या काय आहे Record

Ind W vs Aus W: ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 187 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 5 गडी गमावून 187 धावा करत सामना ड्राच्या स्थितीत आणला. त्यानंतर दोन्ही संघात झालेल्या सुपर ओव्हरच्या (Super over) सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला.

 Thrilling win over Australia in U-20 Super over, Indian women's team's world record
Super overमध्ये सामना जिंकत महिला संघाने घडविला विक्रम  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
  • स्मृतीने 49 चेडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 79 धावा केल्या
  • रेणुका सिंहने सुपर ओव्हरमध्ये दिल्या 16 धावा.

मुंबई: नवी मुंबईतील (Navi Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलिया 
(India and Australia) महिला संघात (women's team) दुसरा सामना झाला. या सामन्यात महिलांच्या टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये थरारक असा विजय मिळवला. दरम्यान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 187 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 5 गडी गमावून 187 धावा करत सामना ड्राच्या स्थितीत आणला. त्यानंतर दोन्ही संघात झालेल्या सुपर ओव्हरच्या (Super over) सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. स्मृती मंधाना, भारताच्या विजयाची स्टार ठरली. तिने आधी 79 धावा तर सुपर ओव्हरमध्ये 13 धावांची वादळी खेळी केली. (Thrilling win over Australia in U-20 Super over, Indian women's team's world record; Find out what is Record)

अधिक वाचा  : पंतप्रधान मोदींनी केली मराठीतून भाषणाला सुरूवात

दोन्ही संघांनी समान धावसंख्या केल्याने मॅच सुपर ओव्हरमध्ये झाली. भारतीय संघाने टीम इंडियाने 20 धावा केल्या. यात स्मृती मंधानाने 3 चेंडूत 13 धावांची खेळी केली. स्मृतीने 1 चौकार आणि 1 षटकार मारला. तर ऋचा घोषने 2 चेंडूत 6 धावा केल्या. हरमनप्रीत कौरने 1 धाव केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 6 चेंडूत 21 धावांची गरज होती. परंतु ऑस्ट्रेलियाला फक्त 16 धावा करता आल्या. भारताकडून रेणुका सिंहने ओव्हर टाकली. या विजयासह भारतीय महिला संघाने इतिहास घडवला. 

काय आहे भारतीय संघाचा विक्रम 

दरम्यान दोन्ही संघांनी एकमेंकांना जशाच तसे उत्तर देत खेळ केला, परंतु यात भारतीय महिला संघाची ताकद अधिक दिसली आणि त्यांनी हा सामना आपल्या नावावर केला. हा थरारक विजय मिळवत भारतीय संघाने विक्रम केला आहे.  भारतीय महिला संघाची ही पहिली सुपर ओव्हर मॅच होती. या पहिल्याच सुपर ओव्हरमधील मॅचमध्ये टीम इंडियाने विक्रम देखील केला. महिला क्रिकेटमध्ये सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी टीम इंडियाने केली आहे. याच बरोबर भारताने जगातील सर्वात मजबूत संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 2022 मधील ऑस्ट्रेलियाने पहिली टी-20 मॅच गमावली आहे. 

अधिक वाचा  : समृद्धी महामार्गावरून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड रोखली  

या विजयासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन महिला आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सलग 16 विजयांचा प्रवासही संपवला.  पहिल्या T20मध्ये भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियन संघाने सलग 16 वा विजय नोंदवला. मात्र हरमनप्रीतच्या सेनेने त्यांना 17 वा विजय मिळवू दिला नाही आणि सुपर ओव्हरच्या सामन्यात सुपर विजयाची नोंद करून कांगारूंचा विजय रथ रोखला. 

स्मृती मंधानाचा डबल धमाका

सुपर ओव्हरमध्ये धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या स्मृती मंधानाने त्याआधी स्फोटक फलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना स्मृतीने 49 चेडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 79 धावा केल्या होत्या. तिच्या या कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी