IND-W vs WI-W Live Score Streaming: भारताच्या महिला टीमने टी 20 वर्ल्ड कप मधील पाकिस्तान विरुद्धची मॅच 7 विकेट राखून जिंकली. आता वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच जिंकून भारत विजयाची मालिका सुरू ठेवण्यास उत्सुक आहे.
पहिल्या सामन्यात स्मृती मंधाना नसताना भारतीय फलंदाजांनी विशेषतः जेमिमा आणि ऋचा घोष यांनी अप्रतिम फलंदाजी केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मंधाना पुनरागमन करू शकते.
भारत पाकिस्तान पाठोपाठ वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच जिंकण्यास उत्सुक आहे तर विंडीज त्यांचा पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे भारत विरुद्ध विंडीज या मॅचमध्ये काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
विंडीजचा इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाला आहे. यामुळे गटात विंडीज तळाशी आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना विजय मिळवणे आवश्यक आहे.
अधिक वाचा : भारतीय क्रिकेटपटू क्षमता वाढवण्यासाठी इंजेक्शन घेतात : शर्मा
कुठे खेळली जाणार आहे भारत आणि वेस्ट इंडिजमधील टी२० वर्ल्ड कपची ही मैच ?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 विश्वचषक सामना न्यूलँड्स केपटाऊन येथे होणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा टी-20 विश्वचषक सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा टी-20 विश्वचषक सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 6 वाजता होईल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा टी-20 विश्वचषक सामना तुम्ही कुठे पाहू शकता?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा टी-20 विश्वचषक सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकता, तर त्याचे थेट प्रसारण हॉटस्टारवर पाहता येईल.