India Vs Afg Football : पराभव असह्य झाल्याने चवताळले अफगाणी खेळाडू, भारतीय खेळाडूंना मारहाण करण्याचा प्रयत्न, पाहा VIDEO

भारतासोबत फूटबॉलचा सामना हरल्यानंतर अफगाणिस्तानी खेळाडू संतप्त झाले आणि भारतीय खेळाडूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

India Vs Afg Football
पराभवाने चवताळलेल्या अफगाणी खेळाडूंचा VIDEO  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • भारताचा अफगाणिस्तानवर 2-1 असा विजय
  • पराभवानंतर अफगाणिस्तानी खेळाडू आक्रमक
  • भांडणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

India Vs Afg Football : खेळामध्ये विजय (Win) आणि पराजय (Loss) हा होतच असतो. मात्र विजय झाल्यावर उन्माद न करणे आणि पराभव झाल्यावर खचून न जाणे यालाच खिलाडू वृत्ती असं म्हटलं जातं. आपला पराभव झाला तरी विजयी झालेल्या खेळाडूचं जो मनापासून अभिनंदन करू शकतो, तोच खरा खेळाडू असतो, असं मानलं जातं. मात्र नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यानंतरचं चित्र पाहता, अफगाणी खेळाडूंचा खिलाडूपणाची दूरदूरवपर्यंत संबंध नसल्याचं दिसून आलं. भारतीय खेळाडूंना अरेरावी करून मारहाण करण्याचा प्रयत्न हे खेळाडू करत होते. आपला पराभव सहन न झाल्यामुळे बदललेली त्यांनी देहबोली सहजपणे दिसत होती. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

अशी घडली घटना

एएफसी एशियन कप क्वालिफायरच्या तिसऱ्या राउंडमध्येही भारतानं आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. शनिवारी कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये भारतानं अफगाणिस्तानवर 2-1 असा विजय संपादित केला. भारताकडून कॅप्टन सुनील छेत्रीनं आणि सहल अब्दुल समद या दोघांनी प्रत्येकी एकेक गोल केला. त्यापूर्वी भारतानं कंबोडियाचा पराभव केला होता. 

अधिक वाचा - IPLमध्ये मिळालेले पैसे वडिलांना देत तिलक वर्मा असं का म्हणाला की, मला यांच्यापासून दूर राहू द्या...

अफगाणी खेळाडूंचा संयम सुटला

भारताविरुद्ध झालेला पराभव अफगाणिस्तानचे खेळाडू सहन करू शकले नाही. ते अचानक आक्रमक झाले आणि भारतीय खेळाडूंच्या अंगावर धावून जाऊ लागले. अफगाणिस्तानचे तीन खेळाडू आणि भारताचे दोन खेळाडू आमनेसामने आले आणि एकमेकांना भिडू लागले. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भारतीय खेळाडू प्रत्युत्तर देऊ लागल्यावर तर त्यांचा राग अधिकच वाढला आणि ते अधिक आक्रमकरित्या भारतीय खेळाडूंना मारहाण करण्याचा प्रयत्न करू लागले. 

अधिकाऱ्यांनी केलं शांत

अगोदर भारताचा गोलकिपर गुरप्रित सिंहनं सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अफगाणी खेळाडूंना दाद दिली नाही. हळूहळू एकेक अफगाणि खेळाडू भांडणात सहभागी होऊ लागला आणि सगळे मिळून भारतीय खेळाडूंच्या अंगावर येऊ लागले. त्यानंतर मात्र एएफजीच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी भारतीय खेळाडूंच्या समोर उभे राहत अफगाणिस्तानी खेळाडूंना रोखण्याचा प्रयत्न केला. 

अधिक वाचा - Joe Root: जो रूटने झळकावले दमदार शतक! सुनिल गावस्कर आणि युनूस खान यांचा विक्रम मोडित

व्हिडिओ होतोय व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून कशा प्रकारे भारतीय खेळाडूंकडे झालेला पराभव अफगाणिस्तानच टीम सहन करू शकली नाही, हे त्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी