टीम इंडियाची बांगलादेशवर २-० अशी मात, रचला नवा इतिहास

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 24, 2019 | 18:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

डे-नाइट क्रिकेट कसोटी सामन्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर टीम इंडियाने बांगलादेशवर ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तसंच भारताचा वेगवान बॅालर उमेश यादवने ५ विकेट आणि इशांत शर्माने ४ विकेट घेतले.

india vs bangladesh day-night test, day 3 highlights, the news in marathi google news 
टीम इंडियाची बांगलादेशवर २-० अशी मात, रचला नवीन इतिहास  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर टीम इंडियाने बांगलादेशवर ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला
  • बॅालर उमेश यादव आणि इशांत शर्माची उत्कृष्ट कामगिरी
  • कॅप्टन विराट कोहलीने १३६ धावा करून नवीन इतिहास रचला

कोलकाता : डे-नाइट क्रिकेट कसोटी सामन्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर टीम इंडियाने बांगलादेशवर ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा वेगवान बॅालर उमेश यादवने ५ विकेट आणि इशांत शर्माने ४ विकेट घेतले. त्यामुळे टीम इंडियाने नवीन इतिहास रचला आहे. तसंच भारतीय कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकूण दोन कसोटी मॅच जिंकल्या आहेत. 

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी डे-नाइट सामना ईडन गार्डनवर खेळण्यात आला. या सामन्यात बांगलादेशचा कॅप्टन मोमिनुल हकने पहिला टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात टीम इंडियाच्या उत्तम बॉलिंगमुळे १०६ धावांवर बांगलादेशच्या संपूर्ण खेळाडूंना बाद करण्यात आलं. टीम इंडियाने टी-२० कसोटी सामन्यात २-१ अशी बाजी मारली होती. आता डे-नाइट या कसोटी सामन्यात बांगलादेशविरूद्ध २-० असा उत्कृष्ट विजय मिळवला आहे.

 

बॅालर उमेश यादव आणि इशांत शर्माची उत्कृष्ट कामगिरी :
टीम इंडियाचा वेगवान बॉलर उमेश यादवने तिसऱ्या ओव्हरमध्ये बांगलादेशच्या इबादत हुसैन, मुश्फिकुर रहीम आणि अल अमी हुसैनची शानदार बॉलिंगने विकेट काढली. तसचं इशांत शर्माने पहिल्याच ओव्हरमध्ये शादमन हुसैन आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये बांगलादेशचा कॅप्टन मोमिनुल हकची विकेट घेतली. इशांत शर्माने तब्बल १२ वर्षानंतर ही उत्तम कामगिरी पार पाडली आहे.

भारताची दमदार खेळी :
कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली, अजिंक्य राहणे आणि चतेश्वर पुजारा या तिघांनी मिळून भन्नाट कामगिरी केली. कॅप्टन विराट कोहलीने १३६ धावा करून नवीन इतिहास रचला आहे. तसंच अजिंक्य राहाणे (५१) आणि चेतेश्वर पुजारा (५५) या दोघांनी अर्धशतक केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाने बांगलादेशवर २४१ धावांची भरभक्कम आघाडी बनवली.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी