Asian Champions Trophy मध्ये भारताने पाकिस्तानची जिरवली, क्रिकेटचा बदला हॉकीमध्ये पूर्ण

India vs Pakistan: ढाका येथे खेळल्या गेलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी गोल केले.

India beat Pakistan in Asian Champions Trophy, cricket's revenge is complete in hockey
Asian Champions Trophy मध्ये भारताने पाकिस्तानची जिरवली, क्रिकेटचा बदला हॉकीमध्ये पूर्ण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला.
  • भारताने पाकिस्तानला 3-1 असे पराभूत केले
  • सामन्यात हरमनप्रीत सिंगने 2 तर आकाशदीप सिंगने 1 गोल केला.

नवी दिल्ली : मैदान आणि खेळ कोणताही असो, भारत (India)आणि पाकिस्तान या दोन्ही देशाचे संघ जेव्हा आमनेसामने असतात (IND vs PAK) येतात, तेव्हा मैदान, स्टेडियम आणि टिव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये रोमांच भरलेला असतो. असेच साहसी खेळ शुक्रवारी ढाका येथे पाहायला मिळाली. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ((Asian Champions Trophy)) साखळी टप्प्यातील सामन्यात भारतीय हॉकी (hockey) संघाने अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तानचा (Pakistan)3-1 असा पराभव केला. ढाका येथील या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना दिसला आणि त्याचा फायदाही झाला.  (India beat Pakistan in Asian Champions Trophy, cricket's revenge is complete in hockey)

हरमनप्रीत आणि आकाशदीपमुळे आघाडी

हरमनप्रीत सिंगने सामन्यात 2 तर आकाशदीप सिंगने 1 गोल केला. तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला पाकिस्तानचा एकमेव गोल जुनैद मजूरने केला. हरमनने पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरद्वारे भारताला आघाडी मिळवून दिली. त्याने 9व्या मिनिटाला गोल करून स्कोअर 1-0 असा केला. मात्र, सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला अर्शदीप सिंगला चुकीच्या टॅकलमुळे २ मिनिटे मैदान सोडावे लागले.

पाकिस्तानने पलटवार केला,

दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताला 2 मिनिटे 10 खेळाडू खेळावे लागले. याचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने पलटवार केला, मात्र भारतीय बचावफळीने सतर्क राहून पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला. पहिल्या हाफपर्यंत भारत १-० ने आघाडीवर होता. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय खेळाडूंनी पूर्ण ताकद दाखवत सामन्यावर नियंत्रण राखले. 41व्या मिनिटाला पाकिस्तानच्या हमामुद्दीनला अंपायरने ग्रीन कार्ड दाखवले आणि त्याला 2 मिनिटांसाठी मैदान सोडावे लागले. याचा फायदा घेत भारताने प्रतिआक्रमण केले आणि आकाशदीप सिंगने 42व्या मिनिटाला रिव्हर्स फ्लिकद्वारे भारताची आघाडी दुप्पट केली. मात्र, तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या काही मिनिटांत पाकिस्तानने गोल करत भारताची आघाडी निम्म्यावर आणली. जुनैद मंजूरने ४५व्या मिनिटाला गोल केला. तिसऱ्या हाफच्या अखेरीस भारत २-१ ने पुढे होता.

रेफरलमुळे मैदानी पंचांना निर्णय बदला

चौथ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरद्वारे बरोबरी साधण्याची संधी मिळाली, मात्र भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगच्या रेफरलमुळे पंचांना निर्णय बदलावा लागला. प्रत्यक्षात, चेंडू पाकिस्तानी खेळाडूच्या पायाला लागल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. मात्र, चेंडू भारतीय डिफेंडरच्या पायाला लागल्याचे मैदानावरील पंचांना वाटले. त्यामुळेच त्याने पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर दिला पण रेफरलमुळे मैदानी पंचांना निर्णय बदलावा लागला.

यानंतर भारताने संपूर्ण आक्रमक हॉकी खेळण्यास सुरुवात केली आणि 53व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी तिसरा गोल केला. हा त्याचा सामन्यातील दुसरा गोल ठरला. यानंतर पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला यश मिळाले नाही.

दिलप्रीतची हॅट्रिक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघ आपली पहिलीच स्पर्धा खेळत आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाविरुद्ध दोन गोलांची आघाडी गमावली आणि कोरियन संघ सामना अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरला. यानंतर भारताने बांगलादेशचा 9-0 असा पराभव करत स्पर्धेत आपले खाते उघडले. भारताकडून दिलप्रीत सिंगने हॅट्ट्रिक केली तर जर्मनप्रीत सिंगनेही २ गोल केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी