Women's T20 World Cup 2020: भारताची न्यूझीलंडवर मात, सेमीफायनलमध्ये एंट्री

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Feb 27, 2020 | 18:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Women’s T20 World Cup 2020 India vs New Zealand: भारतीय महिला टीमनं न्यूझिलंडला रोमहर्षक सामन्यामध्ये ३ रन्सनी पराभूत केलंय. भारतीय महिला टीमनं सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. जाणून घ्या या मॅच विषयी...

Shefali
भारताची न्यूझीलंडवर मात करत सेफीफायनलमध्ये मारली धडक  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • रोमहर्षक मॅचमध्ये टीम इंडियानं न्यूझिलंडला अवघ्या ३ रन्सनं पराभूत केलं.
  • टीम इंडिया महिला टीम टी-२० वर्ल्डकप २०२० च्या सेमीफायनलमध्ये दाखल
  • विजयाची हॅट्रिक पूर्ण करत टीम इंडियानं चवथ्यांदा मारली वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये धडक

मेलबर्न: महिला टी-२० वर्ल्ड कपच्या ‘ग्रुप ए’च्या सामन्यामध्ये भारतीय टीमनं न्यूझीलंडला तीन रन्सनी हरवत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारत या विजयासोबतच सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम बनली आहे. न्यूझीलंडनं टॉस जिंकत बॉलिंग घेतली. त्यामुळे भारतानं पहिले बॅटिंग करत २० ओव्हरमध्ये १३३ रन्सचा स्कोअर उभा केला. यानंतर मैदानात उतरलेल्या किवी टीमनं १९ ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून ११८ रन्स बनवले. अशातच अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी न्यूझीलंडला १६ रन्सची गरज होती. मात्र शिखा पांडेनं केलेल्या शानदार बॉलिंगमुळे किवी टीमला विजय मिळवता आला नाही. अखेर न्यूझीलंडच्या टीमला २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १२९ रन्स बनवता आले. अशा पद्धतीनं टीम इंडियानं ३ रन्सच्या अंतरानं विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आणि चौथ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. शेफाली वर्माला तिच्या दमदार खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ निवडलं गेलं.

विजयासाठी १३४ रन्सचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या किवी टीमची सुरुवात चांगली राहिली नाही. ओपनर रिचेल प्रीस्ट शिखा पांडेच्या बॉलवर कॅच आऊट होत पॅव्हेलिअनमध्ये परतली. तिनं ९ बॉलवर १२ रन्स केले. यानंतर बॅटिंग करण्यासाठी टीमची माजी कॅप्टन सूजी बॅट्स सहाव्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्माच्या बॉलवर बोल्ड झाली. तिनं १३ बॉल्सवर ६ रन्स बनवले. यानंतर भारताची स्टार बॉलर पूनम यादवनं किवी टीमची कॅप्टन सोफी डिव्हाईनला आपल्या स्पिनवर आऊट केलं. २१ बॉल्समध्ये १४ रन्सची खेळी डिव्हाईननं खेळली. यानंतर ७७ रन्सच्या स्कोअरवर ती पॅव्हेलिअनमध्ये परतली. यानंतर ग्रीन आणि मार्टिननं टीमला विजयाच्या दिशेनं पुढे नेलं. अखेर एमिलिया केरनं १९ बॉल्समध्ये ३४ रन्सची खेळी खेळत टीमला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं, पण ते शक्य झालं नाही.

शेफाली वर्माची हाफसेंच्युरी हुकली

१६ वर्षाच्या शेफाली वर्माचा शानदार फॉर्म तिसऱ्या मॅचमध्ये पण बघता आला. तिनं ३४ बॉल्समध्ये ४६ रन्स बनवले. मात्र तिची हाफसेंच्युरी हुकली. १४व्या ओव्हरमध्ये केरच्या बॉलवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाली. आपल्या खेळीमध्ये ४ चौकार आणि ३ षटकार मारले. शेफाली आऊट झाल्यानंतर भारतीय टीमनं १४.५ ओव्हरमध्ये १०० रन्सचा आकडा पार केला. यानंतर वेदा कृष्णमूर्ती ६ रन्स बनवून १६व्या ओव्हरमध्ये LBW झाली. ही भारताची सहावी विकेट होती. वेदा आऊट झाल्यानंतर दीप्ति शर्मा डिव्हाईनच्या बॉलवर जेनसन हाती कॅच देऊन आऊट झाली आणि भारतीय टीमनं सातवी विकेट गमावली.

हरमनप्रीत पुन्हा अपयशी

भारतीय टीमची कॅप्टन हरमनप्रीतची बॅट न्यूझीलंड विरोधात चालली नाही. १३व्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर ती केसपरेकच्या बॉलवर तिच्याच हातून फॉलोथ्रूवर कॅच आऊट झाली. तिनं ५ बॉलवर १ रन बनवला. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ आणि बांग्लादेश विरुद्धच्या मॅचमध्ये तिनं अवघे ८ रन्स बनवले होते.

भारताची खराब सुरूवात

टॉस हरून पहिले बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियासाठी शेफाली वर्मा आणि स्मृति मंधानानं खेळीची सुरूवात केली. मात्र भारतीय टीमनं लवकरच पहिली विकेट गमावली. तापातून बाहेर पडल्यानंतर टीममध्ये परतलेली स्मृति मंधाना तुहूहूच्या बॉलवर बोल्ड झाली. बॉल मंधानाच्या बॅटला लागून स्टंप्सवर लागली होती. तिनं ८ बॉलवर ११ रन्स केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी