Corona: भारतीय संघाच्या या माजी दिग्गज क्रिकेटरला कोरोनाची लागण, पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 21, 2022 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

harbhajan singh corona positive: कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण होत आहे. यात आता हरभजन सिंगचेही नाव आले आहे. भज्जीला कोरोनाची लागण झाली आहे. 

harbhajan singh and dhoni
या माजी दिग्गज क्रिकेटरला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह 
थोडं पण कामाचं
  • भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंगला कोरोनाची लागण
  • ट्विटरवरून दिली माहिती
  • पत्नी गीता बसराही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती

मुंबई: भारतीय संघाचा माजी दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh)ला कोरोना व्हायरसची(corona virus) लागण झाली आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून(twitter account) ही माहिती दिली आहे. अशीही बातमी आहे की त्याची पत्नी गीता बसरा(Geeta Basra)ही कोविड पॉझिटिव्ह आढळली. यानंतर दोघांनी घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. India former cricketer harbhajan singh found corona positive

४१ वर्षीय भज्जीने लिहिले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ही लक्षणे अत्यंत सौम्य आहेत. मी स्वत:ला घरात आयसोलेट केले आहे. सगळ्यांनी योग्य ती खबरदारी घ्या. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनीही लवकरात लवकर आपली तपासणी करून घ्या. कृपया सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या. 

हरभजन कोरोनाबाधित आढळल्याने एक दिवसआधी ओमानमध्ये सुरू झालेल्या लीजेंड्स लीग क्रिकेटला मोठा झटका बसू शकतो. हरभजन सिंग हा इंडिया महाराजास संघाचा भाग आहे. मात्र तो गुरूवारी एशिया लायन्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी उतरला नव्हता. हरभजन सिंगची पत्नी गीता बसराने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. तिने लिहिले आयोसेलेशन मूड. २ वर्षांपासून आम्ही या संक्रमणापासून वाचलो होतो. अखेर या संक्रमणाने आम्हाला पकडलेच. 

गेल्या वर्षी जाहीर केली निवृत्ती

भारतीय फिरकीपटू हरभजन सिंहने २४ डिसेंबर २०२१मध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हरभजन २३ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. उण्यापुऱ्या १७ वर्षांचा असताना कारकिर्दीची सुरुवात त्याने केली होती. हरभजनने १९९८ मध्ये चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नंतर त्याने न्यूझीलंड विरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हरभजनने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी