IND vs NZ 3rd ODI : India is Best; न्यूझीलंडचा धुव्वा; एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत भारत अव्वल

IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वन डे मॅचच्या सीरिजमधील तिसरी मॅच इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झाली. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा दारुण पराभव केला. या विजयासह भारत एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.  

India is Best; india beat of  new Zealand
न्यूझीलंडचा धुव्वा; वनडे सामन्यांच्या क्रमवारीत भारत नंबर 1  |  फोटो सौजन्य: Twitter

IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वन डे मॅचच्या सीरिजमधील तिसरी मॅच इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर  (Holkar Cricket Stadium)झाली. या सामन्यात भारताने (India)न्यूझीलंडचा (New Zealand) दारुण पराभव केला. भारताने न्यूझीलंडवर तिसऱ्या वनडे सामन्यात 90 धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकली आहे. या विजयासह भारत एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.  (India is Best; india beat of  new Zealand; India tops the ODI rankings)

अधिक वाचा  : Kalyan Crime: बीएमडब्ल्यू कारमधून मोठा मद्यसाठा जप्त

भारतीय संघाने श्रीलंकेनंततर आता न्यूझीलंडवरही 3-0 असे वर्चस्व राखले. त्यामुळे भारताने आता सलग सहा वडने सामने जिंकले आहेत. भारताने या सामन्याची दणक्यात सुरुवात केली होती. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी संघाला तुफानी सुरुवात करून दिली. गिलने आजच्या सामन्यात आक्रमक सुरुवात करत त्याने 72 चेंडूत शतक पूर्ण केले. गिल 78  चेंडूत 112 धावा करून बाद झाला.

अधिक वाचा  : Birthday party of Sonya-बर्थ डे आहे सोन्याचा, जल्लोष गावाचा!

दुसरीकडे रोहितनेही या सामन्यात तब्बल तीन वर्षांनी शतक झळकावले. रोहितने आपल्या शतकी खेळीत 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर मात्र भारताची धावांची गती ृ संथ झाली. पण हार्दिक पंड्याचे अर्धशतक आणि शार्दुल ठाकूरच्या 25 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडपुढे 386 धावांचे आव्हान ठेवले. 

भारताच्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमछाक झाली. मात्र डेव्हॉन कॉनवेने भारताच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्ला चढवला. कॉनवेने 12 चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर 100 चेंडूंत 138 धावांची खेळी साकारली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी