दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव; फलंदाजीपेक्षा टीम इंडियाला घातक ठरले शेवटचे षटक, जाणून घ्या पराभवाची इतर कारणं

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या टी-२० (T20) सामन्यात वेस्ट इंडिजने (West Indies) भारताला (India) पराभूत केलं. वेस्ट इंडिजने ५ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताची फलंदाजी (Batting) हवी तशी कामगिरी करू शकली नाही, त्यावर वेस्ट इंडिजला भेट म्हणून मिळालेली शेवटची आवेश खानचे (Avesh Khan) षटक हे भारताला पराभूत करण्यासाठी कारणीभूत ठरले.

India lost in second T20 match
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • वेस्ट इंडिजने ५ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला
  • नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं टीम इंडियाला प्रथम फलंदाजी दिली.
  • या विजयासह विंडीजच्या संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबर केली

सेंट्स किट्स : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या टी-२० (T20) सामन्यात वेस्ट इंडिजने (West Indies) भारताला (India) पराभूत केलं. वेस्ट इंडिजने ५ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताची फलंदाजी (Batting) हवी तशी कामगिरी करू शकली नाही, त्यावर वेस्ट इंडिजला भेट म्हणून मिळालेली शेवटची आवेश खानचे (Avesh Khan) षटक हे भारताला पराभूत करण्यासाठी कारणीभूत ठरले. या विजयासह विंडीजच्या संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबर केली आहे.

सेंट किट्स येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात यजमान संघाने ४ चेंडू राखून सामना जिंकला. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं टीम इंडियाला (India) प्रथम फलंदाजी दिली. परंतु वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीपुढे  भारतीय संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि १३८ धावा करुन सर्व संघ बाद झाला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या  कॅरेबियन संघानं १९.२ षटकांत ५ गडी गमावून हे लक्ष्य गाठलं.  दरम्यान कोणत्या कारणामुळे भारताने हा सामना गमवला या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

मॅकॉयची भेदक गोलंदाजी

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयनं भेदक गोलंदाजी पुढे भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्याने भारताचा निम्मा संघ 17 धावांत गुंडाळला. 6 विकेट्ससह, McCoy T20I मध्ये वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम गोलंदाज बनला. दुसरीकडे, भारताविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमध्ये इतर कॅरेबियन गोलंदाजापेक्षा मॅकॉयची ही सर्वोत्तम कामगिरी होती.

ब्रेंडन किंगचं धडाकेबाज अर्धशतक 

139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रेंडन किंगनं 52 चेंडूत 68 धावा केल्या. 13 षटकांत वेस्ट इंडिजची धावसंख्या 3 बाद 83 अशी असताना त्याने या धावा केल्या. 

Read Also : ड्रोन हल्ल्यात दहशतवादी अल-जवाहिरी ठार; बायडेन झाले खूश

सगळ्यात मोठं कारण म्हणजे आवेश खानची शेवटची ओव्हर 

शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी 10 धावांची गरज होती. 2 षटके शिल्लक असल्यानं भुवनेश्वर कुमार गोलंदाजीसाठी येईल असं वाटत असताना आवेश खान षटक टाकण्यास पुढे आला. साहजिकच कर्णधार रोहित शर्माने हा निर्णय घेतला होता. परंतु आवेश खान दबावात असल्यानं भारताचा पराभव निश्चित झाला. आवेश पहिल्याच चेंडूवर दडपणाखाली आला आणि पहिलाच नो बॉल टाकला. त्याचा परिणाम असा झाला की, एक षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चार जडवत वेस्ट इंडिजनं विजय मिळवला. 

Read Also : Video: भयंकर... १५ वर्षीय मुलीने बहिणीची तलवारीने मानच उडवली

खराब भारतीय फलंदाजी 

भारतीय फलंदाजीची अवस्था बिकट दिसत होती. टीम इंडिया पूर्ण ओव्हरही खेळू शकली नाही. 14व्या षटकापर्यंत 4 बाद 104 धावा झाल्या होत्या. पण नंतर पुढील 34 धावांमध्ये उर्वरित 6 विकेट गमावल्या. 

Read Also : राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करेल: राज्यपाल

असा होता खेळ

सेंट्स किट्स येथे रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतरावर फलंदाज बाद होत गेले आणि भारतीय संघाला २० षटकांमध्ये केवळ १३८ धावाच करता आल्या. भारताकडून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ रविंद्र जडेजा २७ आणि ऋषभ पंतने २४ धावा करत वेस्ट इंडिजसमोर सन्मानजनक आव्हान उभं केलं.

Read Also : राशीभविष्य 2 August 2022: आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी?

भारताने दिलेल्या आव्हानाला पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करत पहिल्या ६ षटकांमध्ये ४६ धावा ठोकल्या. त्यानंतर भारताने विंडीजच्या संघाला पहिला धक्का दिला. पॉवर प्लेनंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड निर्माण करत वेस्ट इंडिजच्या धावसंख्येला ब्रेक लावला. अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती.

मात्र भारताच्या आवेश खानकडून पहिल्याच चेंडूवर चूक झाली आणि हा चेंडू नो बॉल ठरला. त्यानंतर मिळालेल्या फ्री हिटचा फायदा घेत विंडीजच्या डेवोन थॉमसने षटकार खेचला आणि दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ब्रँडन किंगने केलेली ६८ धावांची वादळी खेळी आणि डेवोन थॉमसने शेवटी फटकावलेल्या ३१ धावा वेस्ट विंडीजसाठी गेमचेंजर ठरल्या.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी