ICC Test Championship : श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानं भारताचं झालं नुकसान, गुणतक्त्यात फेकला गेला पाचव्या स्थानी

श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३९ धावांनी पराभव केला. या विजयामुळे त्यांनी दोन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली. लंकेच्या या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC Test Championship) गुणतक्त्यात मोठा फेरबदल झाला असून याचा परिणाम टीम इंडियावर झाला आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलियाला देखील फटका बसला आहे.

Sri Lanka's push to the Indian team, the place went to the merit
श्रीलंकेने भारतीय संघाला दिला धक्का, गुणतक्त्यातील स्थान गेलं  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • लंकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर.
  • ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान गमावले आहे.

नवी दिल्ली: श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३९ धावांनी पराभव केला. या विजयामुळे त्यांनी दोन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली. लंकेच्या या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC Test Championship) गुणतक्त्यात मोठा फेरबदल झाला असून याचा परिणाम टीम इंडियावर झाला आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलियाला देखील फटका बसला आहे.

श्रीलंकेच्या विजयामुळे भारत गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. तसेच अंतिम फेरीत पोहोचण्याचे तसेच विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न देखील भंग होऊ शकते.  लंकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान गमावले आहे. आता दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर केला असून श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान भारताच्या पुढे म्हणजेच चौथ्या क्रमांकावर आहे.

Read Also : पाकिस्तानी पत्रकाराची भारतात हेरगिरी, ISI ला करायचा मदत

टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्रात द.आफ्रिकेने ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने १० पैकी ६ विजय मिळवलेत. या वर्षी आयसीसीने सामना जिंकल्यास १२ गुण, टाय झाल्यास ६, ड्रॉ झाल्यास ४ गुण देण्याचे निश्चित केले आहे. टक्केवारीचा विचार केल्यास विजयावर १०० टक्के, टाय झाल्यास ५० टक्के, ड्रॉ झाल्यास ३३.३३ टक्के मिळतील. गुणतक्त्यातील स्थान टक्केवारीच्या आधारावर निश्चित केले जाणार आहे.

Read Also : LinkedIn प्रोफाईलवर सांगितलं सेक्स वर्कला कामाचा अनुभव

भारताने आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी ६ मध्ये विजय, ४ मध्ये पराभव आणि दोन सामने ड्रॉ झाले आहेत. या शिवाय भारताला ५ गुणांची पेनल्टी देखील बसली आहे. WTCच्या दुसऱ्या हंगामात भारत अजून ६ कसोटी सामने खेळणार आहे. त्यापैकी २ बांगलादेशविरुद्ध तर ४ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी