IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धचा सामना वाढवू शकतो भारतीयांची चिंता, आयसीसी टूर्नामेंटमध्ये पाचपैकी चार सामन्यात टीम इंडिया झालीय पराभूत

IND vs NZ: T20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) भारताला (India) आता सुपर-12 (Super-12) फेरीसाठी पुढील सामना (Match )न्यूझीलंडशी (New Zealand) करावा लागणार आहे.

IND vs NZ: India lose four out of five matches in ICC tournament
न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा इतिहास आहे चिंता वाढवणारा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 127 धावांचे आव्हान दिले असताना टीम इंडियाला न्यूझीलंडच्या संघाने 79 धावांवर ऑलआऊट केले होते.
  • 2003 च्या विश्वचषकापासून भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेत (टूर्नामेंटमध्ये) न्यूझीलंडविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही.
  • यंदाच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला आहे

IND vs NZ: नवी दिल्ली: T20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) भारताला (India) आता सुपर-12 (Super-12) फेरीसाठी पुढील सामना (Match )न्यूझीलंडशी (New Zealand) करावा लागणार आहे. मात्र, हा सामना भारतासाठी सोपा असणार नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा खराब रेकॉर्ड. 2003 च्या विश्वचषकापासून (2003 World Cup) भारतीय संघाने आयसीसी (ICC Tournament)  स्पर्धेत (टूर्नामेंटमध्ये) न्यूझीलंडविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. 

या दोघांमध्ये पाच सामने झाले असून त्यापैकी चार सामन्यांमध्ये किवी संघाने भारताचा पराभव केला आहे. पाचवा सामना हा अनिर्णित राहिला असून हा सामना 2019 मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील ग्रुप  टप्प्यातील होता. पावसामुळे हा सामना रद्द झाला होता. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ दोनदा आमने-सामने आले असून, दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. 

यंदाच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला आहे. यासह न्यूझीलंड हा पहिला कसोटी विजेता संघ ठरला. दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत एकूण 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने केवळ तीन सामने जिंकले, तर न्यूझीलंडने आठ सामने जिंकले. राहिलेला एक सामना हा पावसामुळे एक सामना रद्द झाला होता. टीम इंडियाने 1987 च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला दोनदा पराभूत केले होते. यानंतर 2003 च्या विश्वचषकात त्यांचा सात गडी राखून पराभव झाला होता.

आयसीसी टूर्नामेंटमध्ये पहिल्यांदा दोन्ही संघ 1975 वर्ल्डकपमध्ये आमने-सामने आली होती. त्यावेली न्यूझीलंडने भारतीय संघाला चार विकेटने पराभूत केलं होतं. यापैकी किवी संघाने पाच सामने जिंकले आहेत, तर भारताने तीन सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकालच लागला नाही. 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हे दोन्ही संघ शेवटच्या वेळी समोरा-समोर आले होते. त्यानंतर न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला.

2000 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ODI फॉरमॅट) अंतिम फेरीतही दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. तेव्हा किवी संघाने भारताचा चार गडी राखून पराभव केला. T20 वर्ल्डमध्ये दोन्ही संघ दोनवेळा आमने-सामने आले आहेत. 2007 टी-20 विश्वचषकाच्या गटात न्यूझीलंडने भारताचा 10 धावांनी पराभव केला. तर  2016 च्या T20 विश्वचषकाच्या सुपर-10 मध्ये किवी संघाने भारताचा 47 धावांनी पराभव केला होता. हा तोच सामना आहे जेव्हा टीम इंडिया 127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 79 धावांवर ऑलआऊट झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी