इंग्लंडमध्ये पोहोचली टीम इंडिया

भारताचा पुरुष क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पोहोचला. न्यूझीलंड विरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज खेळण्यासाठी टीम इंडिया लंडनमध्ये दाखल झाली.

india men and women squad reaches england as kl rahul share photo on his twitter account
इंग्लंडमध्ये पोहोचली टीम इंडिया 

थोडं पण कामाचं

 • इंग्लंडमध्ये पोहोचली टीम इंडिया
 • न्यूझीलंड विरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज खेळणार
 • पुरुषांच्या संघासोबतच भारतीय महिलांचा क्रिकेट संघही इंग्लंडमध्ये दाखल

लंडन: भारताचा पुरुष क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पोहोचला. न्यूझीलंड विरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज खेळण्यासाठी टीम इंडिया लंडनमध्ये दाखल झाली. पुरुषांच्या संघासोबतच भारतीय महिलांचा क्रिकेट संघही इंग्लंडमध्ये दाखल झाला. india men and women squad reaches england as kl rahul share photo on his twitter account

टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज केएल राहुल याने फोटो ट्वीट करुन इंग्लंडमध्ये पोहोचल्याची माहिती दिली. भारताचा पुरुष आणि महिला क्रिकेट संघ लंडनहून साउथम्पटन येथे जाईल आणि तिथे हॉटेलमध्ये तीन दिवस क्वारंटाइन राहील. क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सर्व खेळाडूंच्या कोरोना चाचण्या होतील. यानंतर दोन्ही संघ आपापल्या पुढील कार्यक्रमाप्रमाणे स्पर्धेची तयारी करतील. 

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा - २०२१

 1. १८ ते २२ जून - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, भारत विरुद्ध न्यूझीलंड, साउथम्प्टन
 2. ४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी, भारत विरुद्ध इंग्लंड, नॉटिंघम
 3. १२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी, भारत विरुद्ध इंग्लंड, लंडन, लॉर्ड्स मैदान
 4. २५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी, भारत विरुद्ध इंग्लंड, लीड्स
 5. २ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी, भारत विरुद्ध इंग्लंड, लंडन, ओव्हल मैदान
 6. १० ते १४ सप्टेंबर - पाचवी कसोटी, भारत विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर

भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा - २०२१

 1. १६ ते १९ जून - कसोटी, भारत विरुद्ध इंग्लंड, ब्रिस्टल
 2. २७ जून - पहिली वनडे, भारत विरुद्ध इंग्लंड, ब्रिस्टल
 3. ३० जून - दुसरी वनडे, भारत विरुद्ध इंग्लंड, टॉन्टन
 4. ३ जुलै - तिसरी वनडे, भारत विरुद्ध इंग्लंड, वॉर्सेस्टर
 5. ९ जुलै - पहिली टी २० मॅच, , भारत विरुद्ध इंग्लंड, नॉर्थम्पटन
 6. ११ जुलै - दुसरी टी २० मॅच, , भारत विरुद्ध इंग्लंड, होव
 7. १५ जुलै - तिसरी टी २० मॅच, , भारत विरुद्ध इंग्लंड, चेम्सफोर्ड

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी