India-New Zealand 2nd T20I: लखनऊ : पहिल्या टी20 सामन्यात भारताचा दारुण पराभव केल्यानंतर फॉर्मात आलेला न्यूझीलंड संघ (New Zealand) मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील (India-New Zealand) दुसरा टी20 (2nd T20I)सामना (match) हा लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकण्यासह मालिका आपल्या खिश्यात घालण्यासाठी न्यूझीलंडचा संघ हा जीवाची बाजी लावणार आहे. तर पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे भारताला दुसऱ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात दमदार पुनरागमन करावे लागेल. कारण हा सामना भारताच्या हातातून गेला तर भारत टी20 मालिका देखील गमावणार आहे. (India-New Zealand 2nd T20I: do or die' situation for Indian team, win is important to Team India)
अधिक वाचा : रणबीरने रागाने फेकला फॅनचा फोन की आणखी काही?
सलामीच्या विजयाने आता न्यूझीलंड संघाने या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता सलग दुसऱ्या विजयासह न्यूझीलंड टीम मालिका आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. न्यूझीलंड टीमने सप्टेंबर 2012 मध्ये भारतविरुद्ध टी-20 मालिका जिंकली होती. यामुळे 11 वर्षानंतर न्यूझीलंड परत एकदा भारत मात देण्यासाठी तयार झाला आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा टी20 सामना सांयकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर तुम्ही हा सामना पाहू शकतात.
अधिक वाचा : Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल रविवारचा दिवस
रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकीपटूंपुढे भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत इशान किशन, शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांसारख्या युवकांना संधी मिळाली आहे. मात्र त्यांना या संधीचा फारसा उपयोग करता आलेला नाही. न्यूझीलंड संघाने सलामी सामन्यात 21 धावांनी भारतावर मात केली.
अधिक वाचा :सोने-चांदीच्या दरात घसरण,जाणून घ्या काय आहे Gold latest rate
त्यामुळे भारतावर धावांसाठी दडपण आहे. दीपक हुडामध्ये अखेरच्या षटकांत फटकेबाजीची क्षमता असली, तरी त्याला अजून अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही. त्याने गेल्या 13 डावांमध्ये केवळ 17.88 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे या युवकांनी आपला खेळ उंचावून सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांना साथ देणे गरजेचे आहे.
दरम्यान आज भारतीय संघाला लखनऊच्या हाय स्कोअरिंगच्या मैदानावर विजयाची संधी आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत दोन टी-20 सामन्यांदरम्यान 190+ धावसंख्या उभी केली. या दोन्ही सामन्यांत भारताने विजय संपादन केला. भारताने यादरम्यान विंडीजविरुद्ध 2 बाद 195 धावा आणि श्रीलंकेविरुद्ध 2 बाद 199 धावा काढल्या होत्या.
अधिक वाचा : वीज ग्राहकांना महावितरणाकडून दरवाढीचा करंट
मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कर्णधार हार्दिक आता संघात नव्याने मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पृथ्वी व मुकेशकुमारला संधी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शुभमान व अर्शदीपला विश्रांती दिली जाणार आहे.
किशनवर सलामीचे स्थान टिकवण्यासाठी दडपण आहे. किशनने डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले होते. मात्र त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये किशन धावांसाठी झगडताना दिसतो आहे. त्याने जून 2022 पासून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये अर्धशतक केलेले नाही.
कोहलीला विश्रांती आणि श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे महाराष्ट्राचा आक्रमक फलंदाज राहुल त्रिपाठीला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळते आहे. त्रिपाठीने ‘आयपीएल’च्या गेल्या काही पर्वात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला भारताच्या ट्वेन्टी-20 संघात स्थान मिळाले, मात्र त्याला अजून छाप पाडता आलेली नाही.