India vs Pakistan: एका वर्षात पुन्हा भिडणार क्रिकेटचे हे जुने दुश्मन, येथे होणार लढाई

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 07, 2022 | 13:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Pakistan:भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच रोमहर्षक असतो. आता प्रेक्षकांना आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला मिळणार आहे. 

india pakistan
थोडं पण कामाचं
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात या वर्षी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत लढत होणार आहे.
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
  • ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.

मुंबई: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. भारतात क्रिकेटला एक धर्म मानला जातो. भारत-पाकिस्तानच्या सामन्यांना प्रेक्षकांची मोठी पसंती असते. आता भारत आणि पाकिस्तान लवकरच क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध भिडताना दिसणार आहेत. India pakistan head to head match in asia cup

अधिक वाचा - आधी काली डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून वाद, आता ट्वीटवरून वाद

या स्पर्धेत भिडणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात या वर्षी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत लढत होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगू शकतो. 

टी-२० वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला घेणार भारत?

पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये भारतीय संघाला १० विकेटनी हरवले होते. भारत या पराभवाचा बदला घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आशिया कपनंतर २३ ऑक्टोबरला दोन्ही संघ टी-२० वर्ल्डकपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ टी-२० सामने झाले आहेत. यात ६ सामने भारताने जिंकलेत तर २ सामन्यांत पाकिस्तानच्या नशीबी विजय आला. 

या संघानेही केले क्वालिफाय

आशिया कपसाठी यजमान श्रीलंकासोबत टीम इंडिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशनेही आपले स्थान पक्के केले आहे. तर यूएई, नेपाळ, ओमान, हाँगकाँग आणि बाकी संघासाठी क्वालिफायरचे सामने खेळवले जातील. हे सामने २१ ऑगस्टपासून सुरू होत आहेत. तर मुख्य सामने २७ ऑगस्टपासून सुरू होऊ शकतात. 

अधिक वाचा - आधी काली डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून वाद, आता ट्वीटवरून वाद

आशिया कपमध्ये भारताचा शानदार रेकॉर्ड

भारतीय संघाने आशिया कपचा खिताब पाच वेळा आपल्या नावावर केला आहे. तर पाकिस्तानने केवळ दोन वेळा आशिया कप जिंकला आहे. भारतीय संघ आशिया कपचा खिताब वाचवण्यासाठी मैदानावर उतरेल. टीम इंडियाने गेल्यावेळेस बांगलादेशला हरवत हा खिताब जिंकला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी