भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस ठरु शकतो 'बाप'

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 11, 2019 | 20:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

१६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. याच दिवशी जगभरात फादर्स डे देखील साजरा केला जाणार आहे. पण या सामन्याच्या वेळी जर पाऊस पडला तर भारत किंवा पाकिस्तान नव्हे तर पाऊसचं 'बाप ठरेल.

india vs pakistan_AP
भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस ठरु शकतो 'बाप'  |  फोटो सौजन्य: AP, File Image

लंडन: १६ जून २०१९ ही तारीख खूपच महत्त्वाची आहे. कारण की, याच दिवशी विश्वचषक स्पर्धेत दोन अतिशय कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. आता ते कोण आहेत हे तुम्ही ओळखलं असणारच म्हणा... होय... अगदी बरोबर भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष या सामन्याकडे लागून राहिलं आहे. आतापर्यंत विश्वचषकातील पाकिस्तानसोबतचा एकही सामना भारत हरलेला नाही. त्यामुळे ही परंपरा अबाधित राखण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. पण असं असलं तरी या सामन्यात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये सतत पाऊस बरसत आहे. यामुळे आतापर्यंत तीन सामने रद्द करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर देखील पावसाची टांगती तलवार आहे. कारण याच दिवशी ब्रिटनमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता तेथील हवामान खात्याने वर्तवली आहे. या दिवशी होणारा पाऊस अतिशय मुसळधार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दिवशी जर पाऊस बरसला तर भारत आणि पाकिस्तान हा सामना रद्द होण्याची शक्यताच जास्त आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट शौकिन हे नाराज होण्याची शक्यता आहे. 

आतापर्यंत पावसामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका असे तीन सामने रद्द झाले आहेत. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही यावेळी प्रत्येक संघाला १-१ गुण बहाल करण्यात आला आहे. पण यामुळे क्रिकेट रसिकांची खूपच निराशा झाली आहे. यामुळे आता अनेक भारतीय क्रिकेट चाहते आता इंग्लंडमध्ये विश्वचषकाचं आयोजन का करण्यात आलं होतं असा प्रश्न विचारू लागले आहेत. 

दुसरीकडे १६ जून रोजी 'फादर्स डे' साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी भारत आणि पाकिस्तान सामना होणार असल्याने सोशल मीडियातून याबाबत अनेक मिम्स तयार करण्यात आले आहेत. पण जर याच दिवशी पावसाने आपला रंग दाखवला तर भारत किंवा पाकिस्तान नव्हे तर पाऊसच 'बाप' ठरणार आहे. त्यामुळे या दिवशी नेमकं काय होतंय याकडेच आता सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. 

दरम्यान, भारताने आतापर्यंत खेळलेल्या दोनही सामन्यात विजय मिळवत ४ गुणांची कमाई केली आहे. तर गुरुवारी बलाढ्य न्यूझीलंडसोबत भारताचा सामना होणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकूनच भारत पाकिस्तानसोबतच्या सामन्याची तयारी करणार आहे. यामुळे भारताने दोन्ही सामन्यात विजय मिळवून आपलं स्थान मजबूत करावं अशीची सगळ्या देशवासियांची अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस ठरु शकतो 'बाप' Description: १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. याच दिवशी जगभरात फादर्स डे देखील साजरा केला जाणार आहे. पण या सामन्याच्या वेळी जर पाऊस पडला तर भारत किंवा पाकिस्तान नव्हे तर पाऊसचं 'बाप ठरेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola